Loading...

Instagram वर एका पोस्टचे 82 लाख कमवतो विराट; कमाईत रोनाल्डो जगात नंबर वन अॅथलीट

अमेरिकेतील रियालिटी टीव्ही सेलिब्रिटी आणि मॉडेल कायली जेनर इंस्टाग्रामच्या माध्यमातून कमाई करणारी नंबर एक सेलिब्रिटी आहे

Divya Marathi Jul 26, 2018, 11:05 IST

स्पोर्ट्स डेस्क - भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली सोशल साइट इंस्टाग्रामवर जगातील सर्वात आवडत्या खेळाडूंपैकी एक आहे. सोबतच, सोशल मीडियावरून कमाई करण्याच्या बाबतीत सुद्धा तो भारताचा सर्वात मोठा सेलिब्रिटी बनला आहे. विराट इंस्टाग्रामवर एका पोस्टच्या बदल्यात 1,20,000 अमेरिकन डॉलर अर्थात 82,43,000 रुपयांची कमाई करतो. विराटचे इंस्टाग्रामवर 2.32 कोटी फॉलोअर्स आहेत. त्याने अमेरिकन बास्केट बॉल खेळाडू स्टीफन करी आणि अमेरिकन प्रोफेशनल बॉक्सर फ्लाएड मेवेदरला मागे टाकले आहे. इंस्टाग्रामची मार्केटिंग सोल्युशन कंपनी हॉपरएचक्यू 2018 ने इंस्टाग्रामवर सर्वात जास्त कमाई करणाऱ्यांची यादी जारी केली आहे. भारतात नंबर एक असलेला विराट जागतिक स्तरावर 17 व्या क्रमांकावर आहे. 


किम कर्दाशियनची बहिण कायली कमवते 7 कोटी
अमेरिकेतील रियालिटी टीव्ही सेलिब्रिटी आणि मॉडेल कायली जेनर इंस्टाग्रामच्या माध्यमातून कमाई करणारी नंबर एकची सेलिब्रिटी आहे. ती आपल्या एका पोस्टवर तब्बल 10 लाख डॉलर अर्थातच जवळपास 7 कोटी रुपयांची कमाई करते. इंस्टाग्रामवरून कमाई करणाऱ्या खेळाडूंबद्दल बोलावयाचे झाल्यास यात पोर्तुगीस फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो नंबर एकवर आहे. जागतिक यादीत त्याला 7 वे स्थान देण्यात आले आहे. इंस्टाग्रामच्या एका पोस्टवर तो 7,50,000 अमेरिकन डॉलर (5.16 कोटी रुपये) इतकी कमाई करतो. दुसऱ्या क्रमांकावर नेमर जुनिअर आणि तिसऱ्या नंबरवर अर्जेंटिनाचा फुटबॉलर लियोनेल मेसी आहे.

 

इंस्टाग्रामवर रोनाल्डोचे 13.7 कोटी फॉलोअर्स

 

खेळाडू खेळ देश फॉलोअर्स कमाई (डॉलरमध्ये)
क्रिस्टियानो रोनाल्डो फुटबॉल पुर्तगाल 13.7 कोटी 7,50,000
नेमार जूनिअर फुटबॉल ब्राजील 10 कोटी 6,00,000
लियोनेल मेसी फुटबॉल अर्जेंटीना 9.73 कोटी 5,00,000 
डेव्हिड बेकहम फुटबॉल इंग्लैंड 4.97 कोटी 3,00,000
गेरेथ बेल फुटबॉल स्पेन 3.54 कोटी 1,85,000
ज्लाटन इब्राहिमोविच फुटबॉल स्वीडन 3.54 कोटी 1,75,000
लुईस सुआरेज फुटबॉल उरुग्वे 2.92 कोटी 1,50,000
कॉनर मॅक्ग्रेजर डब्लूडब्लूई आयरलैंड 2.45 कोटी 1,25,000
विराट कोहली क्रिकेट भारत 2.32 कोटी 1,20,000
स्टीफन करी बास्केटबॉल अमेरिका 2.13 कोटी 1,10,000

टॉप 5 मध्ये 4 महिला
इंस्टाग्रामवर एका पोस्टसाठी सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप-10 सिलेब्समध्ये 5 महिला आणि 5 पुरुष आहेत. तर टॉप-5 सेलिब्रिटींमध्ये 4 महिला आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर सुद्धा महिलाच आहेत. 

सेलिब्रिटी फॉलोअर्स कमाई (डॉलरमध्ये)
कायली जेनर 11.18 कोटी  10,00,000
सेलेना गोम्ज 13.9 कोटी 800,000
क्रिस्टियानो रोनाल्डो 13.7 कोटी 750,000
किम कर्दशियन वेस्ट 11.4 कोटी 720,000
बेयोंस नोल्स 11.6 कोटी 700,000
ड्वेन जॉनसन 11.1 कोटी 650,000
जस्टिन बीबर 10.1 कोटी 600,000
नेमार जूनियर 10.0 कोटी 600,000
लियोनेल मेसी 9.7 कोटी 500,000
केंडाल जेनर 9.3 कोटी 500,000

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, नंबर एक सेलिब्रिटी कायली जेनरचे फोटो...


Loading...

Recommended


Loading...