Loading...

Shocking VIDEO: सायकलस्वाराला खेटत होते बाइकर्स, दुस-याच क्षणी झाला पश्चाताप

या रोडरेजची तुलना लोक अॅक्शन मूव्हीज आणि व्हिडिओ गेम्सशी करत आहेत. अनेकांना विश्वासच बसला नाही की हा व्हिडिओ खरा आहे.

Divya Marathi Jul 28, 2018, 17:11 IST

इंटरनॅशनल डेस्क - सोशल मीडियावर सध्या एका सायकलस्वार आणि बाइकर्सचा व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत आहे. इटलीत झालेल्या घटनेचा व्हिडिओ सर्वप्रथम डिसेंबर 2017 मध्ये समोर आला होता. या रोडरेजची तुलना लोक अॅक्शन मूव्हीज आणि व्हिडिओ गेम्सशी करत आहेत. अनेकांना विश्वासच बसला नाही की हा व्हिडिओ खरा आहे. परंतु, ही घटना खरोखर सायकल रायडरच्या डॅशकॅममध्ये टिपली आहे. सायकल रायडर एकटाच जात असताना अचानक त्याच्या मागून बाइकवर बसलेले दोन आले आणि हूटिंग करून निघून जाण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी घरी बनवलेल्या रॉकेट लाँचरने त्या सायकलस्वाराने बाइकर्सला धडा शिकवला. 


व्हिडिओमध्ये काय?
इटलीच्या रस्त्यावर रात्रीच्या वेळी सायकलिंग करणाऱ्या एका व्यक्तीच्या डॅशकॅममध्ये हा व्हिडिओ टिपला. डिसेंबरमध्ये घडलेल्या या घटनेत अचानक त्या साकलिस्टच्या मागून बाइकर आले. काहीच कारण नसताना ते बाइकर सायकलस्वाराला खेटून गेले. बाइकर पुढे जात असल्याचे पाहता सायकलस्वार वेळीच त्यांचा पाठलाग करतो. आपल्या सायकलच्या फ्रेममध्ये लावलेल्या एका डिव्हाइसच्या माध्यमातून तो एकानंतर एक आतषबाजीत वापरल्या जाणारे छोटे रॉकेट फायर करतो. एका हाताने सायकलचा तोल सांभाळणारा आणि दुसऱ्या हाताने अचूकपणे रॉकेटने बाइकर्सवर निशाणा साधणाऱ्या या सायकलिस्टचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. त्याने साधलेल्या अचूक निशाण्यात बाइकस्वार पडले. त्यापैकी एक तेथेच कोसळला आणि दुसरा बाइक सोडून पसार होण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी सायकलिस्टने पळून जाणाऱ्यावर सुद्धा फायर केले. यानंतर व्हिडिओ संपला. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, फोटो आणि व्हिडिओ...

 


Loading...

Recommended


Loading...