Loading...

Mars: मंगळ ग्रहावर पाण्याचा तलाव सापडला; पृष्ठभागाखाली 20 किमी परिसरात पाणीच-पाणी

दक्षिण ध्रुवात मंगळाच्या पृष्ठभागाखाली 20 किमी परिसरात पाण्याचा तलाव पसरला आहे.

Divya Marathi Jul 26, 2018, 14:28 IST

वॉशिंग्टन - अखेर मंगळ ग्रहावर पाण्याचा शोध लागल्याचे संशोधकांनी पुराव्यांसह स्पष्ट केले आहे. दक्षिण ध्रुवात मंगळाच्या पृष्ठभागाखाली 20 किमी परिसरात पाण्याचा तलाव पसरला आहे. हे पाणी बर्फाच्या 1 किमी जाड अशा बर्फाच्या चादरीखाली आहे. यूरोपियन स्पेस एजन्सीने मार्स एक्सप्रेस ऑर्बिटरमधून ही माहिती समोर आणली आहे. मंगळवार पाण्याचे पुरावे यापूर्वीच सापडले होते. परंतु, या ग्रहावर अख्खा तलाव सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. 


ऑर्बिटरने पाठवले आकडे
युरोपियन अंतराळ संशोधन संस्थेच्या तज्ञांनी मार्स ऑर्बिटर मंगळ ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी पाठवले होते. त्याच ऑर्बिटरकडून येणाऱ्या आकडेवारी आणि कोड्सचा अभ्यास गेल्या 3 वर्षांपासून केला जात आहे. ऑर्बिटरनेच तेथे पाण्याचा तलाव असल्याचे स्पष्ट केले. या दरम्यान रडारने मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावरून लहरी पाठवण्यात आल्या होत्या. त्या लहरी बर्फाच्या आर-पार निघाल्या. परंतु, पुढे जाऊन परत आल्या. बर्फाच्या पलिकडे पाणी असल्याने त्या लहरी परतल्या आहेत. या बर्फाखाली 20 किमी एवढा प्रशस्त जलसाठा आहे असा दावा संशोधकांनी केला. 

 

मंगळ ग्रहावर एलियन्स? 
मुक्त विद्यापीठात प्रोफेसर असलेल्या डॉक्टर मनीष पटेल यांनी बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक वर्षांपासून विविध देश आणि संशोधक मंगळावर जीवन आणि पाण्याचा शोध घेत आहेत. अनेकांनी आपल्या संशोधनात मंगळावर जीवन नसल्याचा निष्कर्श देखील काढला. परंतु, आता या ग्रहावर पाण्याचे पुरावे सापडल्याने जीव सृष्टीची शक्यता पुन्हा पडताळून पाहिली जाऊ शकते. मंगळ ग्रह एक उष्ण प्लॅनेट आहे. त्यामुळेच, या ग्रहाचा रंग लालसर आहे. यापूर्वी मंगळावर पाण्याचे आणि बर्फाचे अस्तित्व सापडले. परंतु, ते बर्फ घट्ट आणि थंट नाही तर उष्ण आणि जेलीच्या स्वरुपात आहे.


Loading...

Recommended


Loading...