Loading...

डोकलामनंतर पहिल्यांदाच चीनने तिबेटमध्ये केला सैन्य सराव

डोकलामच्या पेचानंतर चीनने पहिल्यांदाच तिबेट भागात सैन्य सरावाचे आयोजन केले होते. त्यात शस्त्रसज्जता तसेच लष्कर-नागरिक या

Divya Marathi Jun 30, 2018, 08:49 IST

बीजिंग- डोकलामच्या पेचानंतर चीनने पहिल्यांदाच तिबेट भागात सैन्य सरावाचे आयोजन केले होते. त्यात शस्त्रसज्जता तसेच लष्कर-नागरिक यांच्यातील संवाद यांचा तपास करण्यासाठी या सरावाचे आयोजन करण्यात आले होते, असा दावा चीनच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.दलाई लामांचे प्रभाव क्षेत्र असलेल्या भागात चीनला एवढ्या वर्षांनंतरही सैन्य क्षमता सिद्ध करता आलेली नाही. 


पिपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) मंगळवारी सैन्याच्या सरावाचे आयोजन केले होते. 'ग्लोबल टाइम्स' ने या वृत्तास दुजोरा दिला आहे. गतवर्षी ऑगस्टमध्ये पीएलएचे १३ तासांचा सराव झाला होता. हा लष्करी सराव युद्धापेक्षा सैन्य व स्थानिक नागरिक यांच्यातील संवाद-संपर्कावर भर देणारा होता. नव्या युगात देशाचे बलाढ्य लष्कर उभारण्याचे उद्दिष्ट आहे. त्या दिशेने चीनने आपल्या प्रयत्न सुरू ठेवले आहेत. किंघाई-तिबेट हा भूप्रदेश अत्यंत दुर्गम आहे. 


सामरिक व शस्त्रास्त्र पातळीवर सैनिकांची सक्षमता वाढवण्यासाठी सैनिकांना प्रशिक्षण देण्यात आले.कारण नागरी संवादाच्या अभावी दुर्गम भागातील युद्ध जिंकणे चिनी सैनिकांसाठी अशक्य झाले आहे. हा आतापर्यंतच इतिहास आहे. शस्त्र पुरवठा करणे, सुटका करणे, आणीबाणीतील दुरुस्ती, रस्ते सुरक्षा इत्यादी क्षेत्रात सैनिकांना प्रशिक्षण देण्यात आले. परंतु लष्कर-नागरिक यांच्यातील एकात्मिक कार्यक्रमावर यंदा भर देण्यात आल्याची माहिती कमांडर झांग वेनलाँग यांनी दिली. 


Loading...

Recommended


Loading...