Loading...

Manager ने Toilet मध्ये भात टाकून खाल्ला, कंपनीतील स्वच्छता सिद्ध करण्यासाठी खटाटोप

चीनमध्ये एका फूड कंपनीने आपल्या आवारातील स्वच्छतेचे स्टॅन्डर्ड सिद्ध करण्यासाठी हद्दच पार केली.

Divya Marathi Jul 23, 2018, 18:05 IST

बीजिंग - चीनमध्ये एका फूड कंपनीने आपल्या आवारातील स्वच्छतेचे स्टॅन्डर्ड सिद्ध करण्यासाठी हद्दच पार केली. फुजिअन प्रांतात टेनफू ग्रुप नावाच्या कंपनीने चक्क युरिनलमध्ये अन्न टाकून खाऊन दाखवले. ऑन कॅमेरा या कंपनीच्या उप महाव्यवस्थापकाने आपल्या हातात राइसने भरलेले बाऊल मुतारीत टाकले. सगळे जण पाहत असताना हाताने त्यातील एक घास उचलला आणि हसतमुखाने ते खाल्ले. यानंतरही ती थांबली नाही. कॅमेरा सुरू असतानाच तिने युरिनलमध्ये आणखी काही चायनीज खाद्य पदार्थ आणि स्वीट्स टाकले. त्यांना आपल्या हातांनी मिसळले आणि पुन्हा खाऊन दाखवले. 


कर्मचाऱ्यांनी टॉयलेटमध्ये लावले डिनर टेबल
आपल्या महाव्यवस्थापक कंपनीची स्वच्छता सिद्ध करत असताना कर्मचारी कसे मागे राहतील. त्यांनीही चक्क डायनिंग रुममधून एक टेबल उचलून टॉयलेटमध्ये आणले. यानंतर कर्मचारी खुर्च्या टाकून टायलेटमध्ये बसले आणि जेवणास सुरुवात केली. गोलमेजला घेरून बसलेल्या कर्मचाऱ्यांनी टॉयलेटमध्येच बसून चिकन, मटन आणि सूपवर ताव मारला. हा सगळाच प्रकार कॅमेऱ्यात शूट करण्यात आला आहे. तसेच कंपनी हा व्हिडिओ प्रचारासाठी देखील वापरत आहे. पर्ल व्हिडिओने हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. 


25 वर्षांपासून अशीच ट्रेनिंग
पर्ल व्हिडिओने दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ फुजिआन प्रांतातील टोनफू या फूड कंपनीत कैद करण्यात आला आहे. या ठिकाणी कंपनीच्या उप-महाव्यवस्थापक आपल्या सुपरव्हायजर्सला ट्रेनिंग देत होत्या. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, स्वच्छता जपण्यासाठी टॉयलेट आणि युरिनल स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. गेल्या 25 वर्षांपासून आपल्या कंपनीत सुपरव्हायजर्सला अशाच प्रकारची ट्रेनिंग दिली जाते असे त्या म्हणाल्या. स्वतः युरिनलमध्ये जेवणारे कर्मचारी स्वच्छतेशी तडजोड करणारच नाहीत असा दावा त्यांनी केला आहे. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटो...


Loading...

Recommended


Loading...