Loading...

80 वर्षीय महिलेने शुभ यात्रेसाठी विमानाच्या इंजिनमध्ये फेकले Coins; 5 तासांचा विलंब

सर्वात अजब-गजब घटनांसाठी ओळखल्या जाणाऱ्या चीनमध्ये एका 80 वर्षीय आजीमुळे मोठा विमान अपघात होण्याची वेळ आली होती.

Divya Marathi Jun 30, 2018, 19:19 IST

बीजिंग - सर्वात अजब-गजब घटनांसाठी ओळखल्या जाणाऱ्या चीनमध्ये एका 80 वर्षीय आजीमुळे मोठा विमान अपघात होण्याची वेळ आली होती. शांघायच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरू विमान उड्डान घेणार होते. सगळेच प्रवासी विमानात बसले होते. त्याचवेळी अचानक विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला आणि तांत्रिक कारणांमुळे विमानाचे उड्डान थांबवावे लागले. यानंतर विमानतळ प्रशासनाने चौकशी केली असता विमानाजवळ त्यांना 9 नाणी सापडली. त्यापैकी एक चक्क विमानाच्या इंजिनमध्ये जाऊन अडकले होते. 

 

गोंधळ झाला तेव्हा गप्प होत्या आजीबाई...
याच विमानात एक 80 वर्षीय आजी आपला मुलगा, सून आणि नातवंडांसोबत प्रवास करत होत्या. त्यांनी विमान निघणार अशी घोषणा होताच इंजिनजवळ एकानंतर एक 9 कॉइन फेकले. विमानाचे इंजिन बिघडल्याचे कळाले तेव्हा या आजीबाई काहीही बोलल्या नाहीत. त्या आपल्या जागेवर शांत बसल्या होत्या. कित्येक तास उलटल्यानंतरही चौकशी सुरूच होती. अखेर कॉइन सापडले. त्यानंतर एका प्रवाशाने या आजींना कॉइन्स फेकताना पाहिल्याचे सांगितले. मात्र, तोपर्यंत 5 तास उशीर झाला होता. सुदैवाने विमान निघाले नव्हते. अन्यथा आकाशात हा प्रकार झाल्यास मोठी दुर्घटना घडली असती असे प्रशासनाने स्पष्ट केले. या विमानात एकूण 150 प्रवासी होते.


कोणती कारवाई?
चीनसह सर्वच देशांमध्ये विमान किंवा प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल असे कृत्य कुणालाही करता येत नाही. असे करताना आढल्यास दंडात्मक आणि प्रशासकीय स्वरुपाची कारवाई केली जाऊ शकते. यात अशा प्रवाशांना आयुष्यभर विमान प्रवास बॅन करण्याची देखील तरतूद आहे. तूर्तास या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू असून त्या महिलेवर आजीवन विमान प्रवास बंदी लागण्याची शक्यता आहे.


Loading...

Recommended


Loading...