Loading...

OMG: वय फक्त 11 वर्षे अन् उंची 7 फूट; होणार जगातील सर्वात उंच Teenager

तब्बल 7 फूट उंच असलेल्या शियायूचे वय फक्त 11 वर्षे आहे. आपल्या वर्गमित्रांमध्ये सगळ्यात वेगळा दिसणाऱ्या या मुलाची सध्या

Divya Marathi Jul 01, 2018, 16:39 IST

बीजिंग - चीनच्या प्राथमिक शाळेतील 6 व्या वर्गात शिकणारा वयाच्या शियायू जगातील सर्वात उंच पुरुषाच्या दिशेने वाटचाल करत आहे. तब्बल 7 फूट उंच असलेल्या शियायूचे वय फक्त 11 वर्षे आहे. आपल्या वर्गमित्रांमध्ये सगळ्यात वेगळा दिसणाऱ्या या मुलाची सध्या चीनमध्ये चर्चा आहे. वर्गात सुद्धा त्याला सर्वात मागच्या बेंचवर बसावे लागते. बाहेर फिरताना सुद्धा लोक त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहतात. आपण लवकरच जगातील सर्वात उंच माणसाचा रेकॉर्ड मोडून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवू अशी स्वप्ने तो पाहत आहे. 

 

अशी मिळाली उंची
शियायू याला ही उंची त्याच्या आई वडील आणि वडिलांकडून मिळाली आहे. त्याचे वडील 5 फूट 11 इंच इतके उंच आहेत. तर आईची उंची 6 फुटांपेक्षा जास्त आहे. चीनमध्ये वयाच्या 11 व्या वर्षी मुलांचे वय 4 ते 5 फुटाच्या जवळपास असते. 

 

किती उंच आहे जगातील सर्वात उंच पुरुष?
जगातील सर्वात उंच माणसाचा खिताब सध्या तुर्कीचे सुल्तान कोसेन यांच्याकडे आहे. 35 वर्षीय सुल्तान यांची हाइट 8 फूट 2.82 इंच इतकी आहे. शियायू सध्या फक्त 11 वर्षांचा आहे. तरीही त्याची उंची 7 फूट झाली आहे. जवळपास 15 इंच हाइट वाढवल्यास तो जागतिक विक्रमाची बरोबरी करू शकेल. 


सर्वात उंच Teenager होऊ शकतो शियायू
सर्वात उंच पुरुष होण्यासाठी त्याला वेळ असला तरी तो सर्वात उंच टीनेजर (13 ते 19 वयोगटातील) आवश्य ठरू शकतो. सध्या सर्वात उंच टीनेजरचा विक्रम ब्रिटनमध्ये राहणाऱ्या ब्रॅन्डन मार्शलच्या नावे आहे. तो 16 वर्षांचा असून त्याची उंची 7 फूट 4 इंच आहे. फक्त 11 वर्षांचा असल्याने लवकरच तो मार्शलचा रेकॉर्ड मोडू शकतो. 


चालण्यात अडथळे
वयाच्या तुलनेत उंची अधिक असल्याने शियायूला पायांचा त्रास सुरू झाला आहे. त्याचे तळपाय सपाट आहेत. त्यामुळे चालताना अडथळे येतात. विविध रुग्णालयांमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. परंतु, फारसा परिणाम झाला नाही. तळपाय सपाट असल्याने तो आपल्या शरीराचा तोल सांभाळू शकत नाही.


Loading...

Recommended


Loading...