Loading...

इंजिनियरिंगचा चमत्कार: अमेरिकेतील हे धरण जितके सुंदर तितकेच धोकादायक

मानवी जीवनाच्या प्रगतीत नेहमीच तलाव, धरणे याचे मोठे योगदान राहिले आहे.

Divya Marathi Mar 01, 2018, 00:12 IST
हूवर डॅम...

इंटरनॅशनल डेस्क- मानवी जीवनाच्या प्रगतीत नेहमीच तलाव, धरणे याचे मोठे योगदान राहिले आहे. त्यामुळे केवळ पाण्यात संचय, साठाच होत नाही तर महापूरसारख्या घटनाही नियंत्रित करता येतात. स्वच्छ पाण्याची जगाला समस्या भेडसावत असल्याने जगभर मोठमोठ्या धरण-तलाव बांधले जात आहेत. याच निमित्ताने आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अमेरिकेतील ‘हूवर’ डॅमबाबत, ज्याने सुमारे 82 वर्षापूर्वी इंजिनियरिंगच्या जगात चमत्कार केला होता. हा डॅम 1 मार्च, 1936 रोजी खुला केला होता. जगातील सर्वात मोठे व उंच धरण....

 

हा जगातील पहिला सर्वात उंच आणि मोठा डॅम होता. सुंदरतेसोबतच हा डॅम जगातील सर्वात धोकादायक मानला जातो. कारण हे धरण बांधताना शेकडो मजूराचा मृत्यू झाला आहे. याशिवाय या धरणाची उंची 221.4 मीटर आहे, जेथून पाहाणा-याचा थरकाप उडतो. जबरदस्त विरोधानंतर हे धरण बांधले गेले. हे धरण बांधल्यानंतर अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रॅंकलिन डी. रूझवेल्ट यांनी म्हटले होते की, ‘हे धरण इंजिनियरिंग जगाला एक दिशा देईल आणि पुढे घडलेही असेल.

 

एक नजर टाकूया हूवर डॅमवर...

 

कुठे : अॅरिझोना (अमेरिका)
ऊंची : 221.4 मीटर
लांबी : 379 मीटर
धरण बांधण्याचा खर्च : 49 मिलिअन डॉलर ( सध्याचे 327 कोटी रुपये)

 

पुढे स्लाईडद्नारे पाहा, हूवर डॅम धरणाबाबत विस्तृत माहिती व फोटो...


Loading...

Recommended


Loading...