Loading...

अण्णाभाऊ साठे जयंती विशेष: सांगली ते मुंबई केला पायी प्रवास; पोहोचले मॉस्को, तळागाळातील हृदयापर्यंत

\'पृथ्वी ही शेषाच्या फणावर नाही तर कामगारांच्या तळहातावर तरली आहे\', हे तत्वज्ञान मांडणारे अण्णाभाऊ साठे संयुक्त महाराष्ट्

Divya Marathi Aug 01, 2018, 15:18 IST
भारत स्वातंत्र्य होण्याआधी देशात दलितांची काय अवस्था होती, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. त्याकाळी सांगलीच्या एका खेड्यातील एक मुलगा मुंबईच्या मायानगरीत येतो आणि मुंबईचाच होऊन जातो. नंतर तो केवळ मुंबई किंवा महाराष्ट्राचा नाही तर या विश्वाचाही होतो. ती व्यक्ती म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊंची आज (1 ऑगस्ट) जयंती आहे.   'पृथ्वी ही शेषाच्या फणावर नाही तर कामगारांच्या तळहातावर तरली आहे', हे तत्वज्ञान मांडणारे अण्णाभाऊ साठे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सक्रिय सहभागी झाले होते. शाहीर अमर शेख आणि अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात अनेक पोवाडे लिहून सरकारवर असूड ओढले होते. लाखोंच्या जनसमुदायाला खिळवून ठेवण्याची ताकद या शाहीरात होती. लौकीकार्थाने दोनच दिवस शाळेत गेलेल्या अण्णाभाऊंनी शेकडो कथा, नाटके, प्रवासवर्णने आणि 35 हून अधिक कादंबर्‍या लिहिल्या.   पुढील स्लाइडवर वाचा, कोणकोणत्या कादंबर्‍यावर तयार झाले चित्रपट.

 


Loading...

Recommended


Loading...