Loading...

महाभारत : 2019 हिंसा, मृत्यू, आपत्तीत नेते एकमेकांची खिल्ली का उडवत असतील?

देशवासीयांसाठी हा आठवडा त्रासदायक ठरला. वास्तवात राजकारण लोकांप्रति उत्तरदायी असते, तर ते गेल्या आठवड्यात दिसलेल्या खिल्

Divya Marathi Jun 17, 2018, 05:07 IST

देशवासीयांसाठी हा आठवडा त्रासदायक ठरला. वास्तवात राजकारण लोकांप्रति उत्तरदायी असते, तर ते गेल्या आठवड्यात दिसलेल्या खिल्लीत अडकले नसते.  ईशान्य भारत जळत आहे. पण राहुल गांधींचा वेळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फिटनेस व्हिडिओची खिल्ली उडवण्यात जात आहे. काश्मीर पुन्हा मृत्यूचे खोरे होत आहे. पण हिंसेचे उत्तर विकास आहे, हे सांगण्यात पंतप्रधानांची शक्ती जात आहे. विकासाच्या सर्वात मोठ्या १० योजना २ ते ३ टक्के पूर्ण झाल्या असताना, महागाई गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट झाली असताना ते असे म्हणत आहेत.  


देशभर शेतकरी दुर्दशा, दुर्बलता, दु:खाने व्याकुळ आहेत. पण राष्ट्रीय चिंतनाचा निरर्थक विषय झाला- संघाच्या कार्यक्रमात गेल्यामुळे प्रणव मुखर्जींना राहुल गांधी इफ्तार पार्टीत बोलावणार की नाही? की भाजपतर्फे आयोजित एकमेव इफ्तार पार्टीत तिहेरी तलाकच्या बळी झालेल्या महिलांनाच निमंत्रण का होते?  


भीमा कोरेगावचा धक्का बसला. मागासांवर झालेल्या चर्चेत मुख्य चिंता रोजगार आणि उत्थान ही नव्हती. चिंता होती ती ज्याचे नाव पंतप्रधानांच्या हत्येसाठी माओ दहशतवाद्यांनी रचलेल्या कटात होते त्या नेत्याला का पकडले. आपल्या राजकीय चर्चेचा स्तर खूप घसरला आहे. पंतप्रधानांच्या हत्येच्या कटाला विरोधकांनी खिल्ली उडवण्याची सर्वोत्तम संधी मानली. सरकारमधील सहकारी शिवसेनेने त्याला ‘हॉरर चित्रपट’ असे संबोधले.  नेत्यांनीही टोमण्यांची संधी स्वत: तयार केली. कोक सरबत तयार करणाऱ्याने तर मॅकडोनाल्ड ढाबेवाल्याने बनवले असे म्हणून.  


तामिळनाडूत हिंसा होवो, गरीब-मजूर मरत असो- पण तेथे सरकार याच कामात आहे की राजीव गांधींच्या हत्याऱ्यांना आता सोडले पाहिजे. ‘कारण ते सात जण बिचारे दु:खी, आजारी, मानसिक छळाने ग्रस्त आहेत.’  देश असे राजकारण, अशा नेत्यांना स्वीकारेल का?  

धृतराष्ट्रच नाही, येथे धर्मराजही डोळे झाकून बसला आहे. सत्तेचे वस्त्रहरण होत आहे.  


Loading...

Recommended


Loading...