Loading...

शेणापासून ही व्यक्ती बनवते साबण-तेल, दरवर्षी करते 5 कोटीचा व्यवसाय

गाईचे तुप, दुध आरोग्यासाठी चांगले असल्याचे सांगण्यात येत. शेणापासून बायोगॅस निर्मितीबद्दलही तुम्ही ऐकले असेल

Divya Marathi May 25, 2018, 14:08 IST
काऊपॅथीचे संस्थापक उमेश सोनी.

नवी दिल्ली- गाईचे तुप, दुध आरोग्यासाठी चांगले असल्याचे सांगण्यात येत. शेणापासून बायोगॅस निर्मितीबद्दलही तुम्ही ऐकले असेल. पण तुम्ही कधी ऐकले आहे की शेण आणि गोमूत्रापासून बनविलेल्या साबणापासून स्नानही करता येते. आम्ही तुम्हाला एका अशा व्यक्तीबद्दल माहिती देत आहोत ज्याने शेणाचा वापर करुन कोट्यावधी रुपये कमावले     आहेत. मुंबईत असलेली त्यांची कंपनी गाईच्या शेण आणि गोमूत्रापासून साबण, टूथपेस्ट, क्रीम, फेस वॉश आणि अन्य कॉस्मॅटिक प्रोडक्ट बनवते.

 

 

गाईच्या शेण-गोमूत्रापासून बनवतात प्रोडक्ट
काऊपॅथीचे फाउंडर उमेश सोनी यांनी दिव्य मराठीला सांगितले की, शेणात आणि गोमूत्रात आजाराशी लढण्याचे अनेक गुण आहेत. आयुर्वेदात पंचगाव्य म्हणजे गोमूत्र, गायीचे शेण, दूध, दही आणि तूप याद्वारे आजारांवर उपायांचा उल्लेख आहे. या सगळ्याच विचार करुन त्यांनी शेण आणि गोमूत्रापासून साबण बनविण्यास सुरुवात केली. हळूहळू लोकांना कळल्यावर या वस्तूंना मागणी वाढली. त्यामुळे बिझनेसही वाढला.  

 

 

पुढे वाचा: किती लागले भांडवल

 


Loading...

Recommended


Loading...