Loading...

रिलायन्सचा शेअर 3.25 टक्क्यांनी घसरला; गुंतवणूकदारांचे 21325 कोटी रुपयांचे नुकसान

रिलायन्सच्या शेअरमध्ये 3.5% टक्क्यांची घसरण झाल्याने गुंतवणूकदारांना 21325 कोटींचा फटका बसला आहे. शुक्रवारी बाजार

Divya Marathi Apr 30, 2018, 14:08 IST
100 बिलियन डॉलर क्लबच्या रेसमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज सगळ्यात पुढे आहे. (संग्रहित फोटो)

मुंबई/नवी दिल्ली- रिलायन्सच्या शेअरमध्ये 3.5% टक्क्यांची घसरण झाल्याने गुंतवणूकदारांना 21325 कोटींचा फटका बसला आहे. शुक्रवारी बाजार बंद होताना रिलायन्सच्या शेअरचा दर 994.75 रुपयांवर होता. सोमवारी तो 961.10 पर्यत कोसळला. शुक्रवारी कंपनीचे 630413 कोटी रुपये बाजारमुल्य होते. ते घटल्याने 21325 कोटी रुपयांचे गुंतवणूकदारांचे नुकसान झाले आहे. 

रिलायन्सच्या शेअरने 992 रुपयांवरही पोहचला होता. पण सध्या तो 2.65 टक्क्यांनी घसरला असून 968 रुपयांवर आहे.  

 

 

शेअर का कोसळला?
कंपनीने पुढील काही महिन्यात केजी डी-6 ब्लॉकमधून तेल आणि गॅसचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारी ते मार्च या तिमाही या क्षेत्रातून गॅसचे उत्पादन घटले आहे. ते केवळ 4.3 मिलियन स्टॅन्डर्ड क्यूबिक मीटर्स प्रति दिन एवढे राहिले आहे. कंपनीचे याचे कारण नैसर्गिक असल्याचे म्हटले तर बंगालच्या उपसागरात असलेल्या प्रकल्पातूनही उत्पादन बंद करण्यात आले आहे. हेच यामागचे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. 

 

 

कंपनीला 9,435 कोटी रुपयांचा संकलित नफा

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानीच्या नेतृत्वातील कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजला जानेवारी - मार्च 2018 मध्ये 9,435 कोटी रुपयांचा संकलित नफा झाला आहे. मार्च 2017 च्या तिमाहीमध्ये झालेल्या 8,046 कोटी रुपयांच्या तुलनेत हा 17.3 टक्के जास्त आहे. नफ्याची ही रक्कम रिलायन्सच नाही, तर भारतातील कोणत्याही कंपनीच्या दृष्टीनेही विक्रमी आहे. कंपनीचा महसूल 39 टक्क्यांनी वाढून 1,29,120 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. पूर्ण वर्षात कंपनीला 4,30,731 कोटींच्या महसुलावर 36,075 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने प्रति शेअर 6 रुपये लाभांश देण्याचाही निर्णय घेतलेला आहे.

 

पुढे वाचा:

 


Loading...

Recommended


Loading...