Loading...

पोस्टातील तुमच्या पैशाची सरकार देते 100% गॅरंटी, बँकेत फक्त 1 लाख रुपये सुरक्षित

तुमचा बँकेत ठेवलेला पैसा किती सुरक्षित आहे असा प्रश्न तुम्हाला अनेकदा पडत असेल. तुमचा बँकेत ठेवलेला पैसा हा

Divya Marathi Jun 26, 2018, 19:46 IST

नवी दिल्ली- तुमचा बँकेत ठेवलेला पैसा किती सुरक्षित आहे असा प्रश्न तुम्हाला अनेकदा पडत असेल. तुमचा बँकेत ठेवलेला पैसा हा काही प्रमाणातच सुरक्षित असतो. तुम्ही बँकेत ठेवलेल्या एक लाख रुपयांची तुम्हाला गॅरंटी मिळते. तर पोस्टात ठेवलेला पैसा हा बॅंकेपेक्षा अधिक सुरक्षित असतो. 

 

 

का बँकेपेक्षा सुरक्षित आहे पोस्टातील गुंतवणूक


1. बॅंकेत घोटाळा झाल्यास
समजा बँकत घोटाळा झाला तर अशा वेळी खातेदारांच्या पैशाचे काय होईल अशी मोठी चिंता असते. अशा वेळी तुमच्या केवळ एक लाख रुपयांच्या गुंतवणूकीच्या सुरक्षेची गॅरंटी असते. म्हणजेच तुमची जर बँकेत एक लाखापेक्षा अधिक रक्कम असेल तर त्याची कोणतीही गॅरंटी नाही. डिपॉजिट इन्शुरन्स अॅण्ड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कायद्यानुसार एका ग्राहकाला जास्तीत जास्त केवळ एक लाख रुपयाची गॅरंटी देते. हा नियम बँकेच्या प्रत्येक शाखेसाठी लागू आहे. यात मुळ रक्कम आणि व्याजाचा समावेश आहे. म्हणजेच तुमची मुळ रक्कम आणि व्याज मिळून एक लाख रुपये असतील तर ते सुरक्षित आहेत. 

 

 

टपाल विभाग तुमची रक्कम परत करण्यास अपयशी ठरल्यास
पोस्ट ऑफिसमध्ये जमा पैशाची गॅरंटी असते. याचाच अर्थ पोस्टल डिपार्टमेंट गुंतवणूकदारांना रक्कम परत करण्यास अपयशी ठरल्यास सरकार पुढे होऊन गुंतवणूकदारांच्या पैशाची गॅरंटी घेते. त्यामुळे तुमचे पैसे अडकून राहत नाहीत. 

 

 

बॅंकेत असणाऱ्या पैशाचे होते काय
बँका आपल्याकडे असणाऱ्या पैशाचा उपयोग ऑपरेशन्स वाढविण्यासाठी करतात. अनेकदा सर्वसामान्यांना आणि कॉर्पोरेटला कर्ज दिले जाते. पण त्यांनी कर्जफेड न केल्यास बँका अडचणीत येतात. पीएनबी घोटाळा आणि विजय माल्या ही याची ताजी उदाहरणे आहेत.

 

 

पोस्टातील गुंतवणूकीचे होते काय
पोस्ट ऑफिसमध्ये असणाऱ्या पैशाचा वापर सरकार आपल्या कामासाठी करते. त्यामुळेच या पैशांवर सरकार गॅरंटी देते. 

 

 


Loading...

Recommended


Loading...