Loading...

सरकारची इच्छा असल्यास पेट्रोल 25 रूपयांनी स्वस्त होऊ शकते: पी. चिदंबरम

देशातील पेट्रोलचे दर सरकारची इच्छा असल्यास 25 रूपयांपर्यंत कमी होऊ शकतात, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थ

Divya Marathi May 23, 2018, 15:03 IST

नवी दिल्ली-  देशातील पेट्रोलचे दर सरकारची इच्छा असल्यास 25 रूपयांपर्यंत कमी होऊ शकतात, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी केले आहे. इतकी कपात करता येणे शक्य असले तरी सरकार या दिशेने पाऊल उचलत नसल्याचा आरोप त्यांनी केला. वाढत्या इंधन दरावर त्यांनी सलग ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली.

 

 

पेट्रोलचे दर 25 रूपयांपर्यंत कमी होऊ शकतात. पण सरकार असे करणार नाही. ते पेट्रोलचे दर 1 किंवा 2 रूपयांनी कमी करून लोकांची दिशाभूल करतील, असे ट्विट त्यांनी केले. गत नऊ दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. चिदंबरम म्हणाले की, केंद्र सरकार प्रत्येक एक लिटरमागे 25 रूपये जास्त घेत आहे. हा थेट नागरिकांचा पैसा आहे. क्रूड ऑईलच्या किमतीवर सरकार एका लिटरमागे 15 रूपये वाचवत आहे. त्यानंतर ते 10 रूपयांचा अतिरिक्त कर लावत असल्याचे ते म्हणाले.


Loading...

Recommended


Loading...