Loading...

घरात पसरलेल्या वस्तूंमुळे मिळाली आयडिया, 2 महिन्यात झाल्या करोडपती

यशस्वी होणारी कल्पना तुम्हाला कधीही आणि कुठेही सुचू शकते. आम्ही तुम्हाला अशाच एका कोट्यधीश महिलेची माहिती दे

Divya Marathi Jun 15, 2018, 15:55 IST

नवी दिल्ली- यशस्वी होणारी कल्पना तुम्हाला कधीही आणि कुठेही सुचू शकते. आम्ही तुम्हाला अशाच एका कोट्यधीश महिलेची माहिती देत आहोत. या महिलेने लोकांना गिफ्ट देण्यासाठी एक वस्तू बनवली पण त्यांच्या पतीची अचानक नोकरी गेल्यानंतर त्यांनी हे प्रोडक्ट बाजारात आणले. हे प्रोडक्ट बाजारात आल्यावर 2 महिन्यातच ही महिला करोडपती झाली. 

 

 

काय आहे स्टोरी
अमेरिकेत राहणाऱ्या किम लेवाइंस 2000 मध्ये एक सामान्य महिला होत्या. त्यांना शिवणकामाची आवड होती. किम यांच्या घरात पाळीव जनावरे होती. त्या जनावरांनी त्यांचे पती मक्याचे दाणे खाऊ घालायचे. एक दिवस त्यांचे पती मक्याचे पाकीट त्यांच्या शिलाई मशीनच्या शेजारी ठेवून निघून गेले. त्यावेळी त्यांना असे वाटले की अशी मक्याच्या दाण्याने भरलेली उशी बनविल्यास काय होईल. हे मक्याचे दाणे मायक्रोवेव्हमध्ये ठेवून गरम केल्यास ती यातुन उबही मिळू शकते असा विचार त्यांनी केला. या विचारातूनच व्यूविटचा जन्म झाला. स्पा थेरिपी असलेली उशी निर्माण करणाऱ्या किम अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या. 

 

 

कसे मिळाले यश
किम यांनी सुरुवातीला ही उशी आपल्या जवळपास राहणाऱ्या लहान मुलांना गिफ्ट दिली. एका मुलाखतीत किम यांनी सांगितले की, उशी दिल्यानंतर लोक त्यांच्या घरी पोहचू लागले. लोकांचे म्हणणे होते की उशीसोबत अतिशय आरामात झोपत आहेत. हे लोक उशीची किंमत देण्यास तयार होते. लोकांचा रिस्पॉन्स पाहुन त्यांनी ही आयडिया पुढे नेण्याचा विचार केला. सुरुवातीला किम यांनी लहान स्टॉल लावून या उशांची विक्री केली. तिथेही चांगला रिस्पॉन्स मिळू लागल्यावर त्यांनी मॉलवाल्यांशी संपर्क केला. एका चैन स्टोअरने त्यांच्या उशीची गुणवत्ता पाहून ती आपल्या येथे ठेवण्यास परवानगी दिली. किम यांना आपल्या वस्तूची ताकद लक्षात आल्याने त्यांनी मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी सहयोगीचा शोध सुरु केला. काही दिवसातच त्यांचे व्यूविट मॉलमध्येही दिसू लागले. किंम लेविंस यांच्या साईटवर असलेल्या माहितीनुसार मार्केटमध्ये उतरल्यावर पहिल्या 2 महिन्यातच त्यांची विक्री 2.25 लाख डॉलरहून अधिक झाली होती. त्या काळानुसार ही किंमत एक कोटी रुपयांहून अधिक होती. 

 

 

कशी बनवली टॉप उद्योगपतींमध्ये जागा
किम यांचे प्रोडक्ट खूप साधारण होते. त्यामुळे व्यूविटचे यश सर्व ठिकाणी कॉपी करण्यात येऊ लागले. त्यामुळे किम यांनी आपल्या प्रोडक्टच्या डिझाईनमध्ये बदल केला. त्याच्या दर्जात बदल केला. त्यांनी लहान मुलांसाठी खास रेंज बनवली. त्यांच्या प्रोडक्टच्या प्रमोशनमध्ये आरोग्याशी निगडित बाबी सांगण्यात येऊ लागल्या. अशा रितीने प्रोडक्ट आपल्या सेग्मेंटचे लीडर बनले. त्याची किंमतही माफक ठेवण्यात आली. आता हे प्रोडक्ट कोट्यवधी डॉलरचे झाले आहे.  

   


Loading...

Recommended


Loading...