Loading...

Gold Market: सोन्याच्या किंमतीत 330 रुपयांनी वाढ, चांदीने 42 हजाराचा टप्पा केला पार

सोन्याच्या भावात 330 रुपयांनी वाढ झाली असून प्रति 10 ग्रॅमसाठी 32,190 रुपये मोजावे लागत आहेत. तर चांदीतही ते

Divya Marathi Jun 16, 2018, 10:43 IST

नवी दिल्ली- सोन्याच्या भावात 330 रुपयांनी वाढ झाली असून प्रति 10 ग्रॅमसाठी 32,190 रुपये मोजावे लागत आहेत. तर चांदीतही तेजी कायम असून भाव 450 रुपयांनी वाढून 42,400 हजार रुपयांवर पोहचला आहे. अमेरिका आणि चीनमध्ये सुरु असणाऱ्या ट्रेड वॉरमुळे डॉलर कुमकुवत झाला आहे. तर स्थानिक पातळीवर व्यापारी आणि खरेदीदारांकडून मागणी वाढली आहे.

 

 

वैश्वि‍क स्‍तरावर किंमतीत वाढ
वैश्विक स्तरावर सोन्याच्या किंमतीत 0.24 टक्के वाढ झाली आहे. न्यूयॉर्क ट्रेड मार्केटमध्ये सोन्याचा भाव  1,301.90 अमेरि‍की डॉलर प्रति‍ ऑन्‍स  तर चांदीचा भाव 0.74 टक्क्यांनी वाढून 17.13 अमेरि‍की डॉलर प्रति‍ ऑन्‍सवर पोहचला आहे. एक्‍सपर्टचे म्हणणे आहे की, रुपया डॉलरच्या तुलनेत कमजोर झाल्यानेही सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. 


Loading...

Recommended


Loading...