Loading...

मार्केटमधून कमाईचे हे आहेत 8 मंत्र, कमी गुंतवणूकीतच कमवाल लाखो

तुम्हाला चांगला पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला मोठी रक्कम गुंतवावी लागेल हा केवळ एक गैरसमज आहे. तुम्ही कमी गु

Divya Marathi Apr 30, 2018, 10:31 IST

नवी दिल्ली- तुम्हाला चांगला पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला मोठी रक्कम गुंतवावी लागेल हा केवळ एक गैरसमज आहे. तुम्ही कमी गुंतवणूक करुनही चांगला पैसा कमावू शकता. पण तुम्हाला बाजाराचे काही मुलभूत नियम लक्षात घ्यावे लागतील. हे ते नियम आहेत जे अनेक मोठे गुंतवणूकदार शेअर बाजारात अवलंबतात. आज आम्ही तुम्हाला असेच काही नियम सांगणार आहोत.

 

 

मोठे गुंतवणूकदारही अवलंबतात हे नियम
आम्ही तुम्हाला असे 8 मंत्र सांगत आहोत जे वॉरेन बफे, राजेश झुनझुनवाला आणि आर.के. दमानी यांनी अवलंबले आहेत. या सगळ्यांची गुंतवणूक आज कित्येक पटीने वाढली आहे. राजेश झुनझुनवाला आणि आर. के. दमानी हे भारतातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जातात. तर वॉरेन बफे हे तर जगातील श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जातात. 

 

 

पहिला मंत्र: वाट पाहत बसू नका
- वॉरेन बफे यांच्या मतानूसार मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कोणतीही वेळ ही योग्य वेळ असते. तुम्ही मार्केटमध्ये योग्य वेळ येण्याची वाट पाहत बसू नका. तुम्ही कोणत्याही कंपनीचा स्टॉक योग्य किंमतीत मिळत असेल तर गुंतवणूक करा. भले त्यावेळी बाजारात दबाव असेल. 
- अनेक गुंतवणूकदार हे योग्य वेळेची वाट बसतात आणि गुंतवणूकच करत नाहीत. वेळ निघून गेल्यावर ते उच्च किंमतीला शेअर खरेदी करतात आणि नंतर त्यांना नुकसान सहन करावे लागते.

 

 

पुढे वाचा: दुसरा आणि तिसरा महत्वाचा मंत्र...


Loading...

Recommended


Loading...