Loading...

दरमहा करा 84 रुपये जमा, सरकारकडून आजीवन मिळेल 24 हजार रुपयांची पेन्शन

तुम्ही अनेकदा चित्रपट पाहिला गेल्यावर 150-200 रुपये सहज खर्च करता. तुम्हाला ही रक्कम कदाचित जास्तही वाटत नसे

Divya Marathi Jun 15, 2018, 17:13 IST

नवी दिल्ली- तुम्ही अनेकदा चित्रपट पाहिला गेल्यावर 150-200 रुपये सहज खर्च करता. तुम्हाला ही रक्कम कदाचित जास्तही वाटत नसेल पण तुम्ही हीच रक्कम आपल्या भविष्यासाठी गुंतवल्यास तुम्हाला आजीवन उत्पन्नाचे साधन मिळू शकते. केवळ 84 रुपयांची मासिक बचत करुन तुम्ही वार्षिक 24000 रुपये मिळवू शकता.

 

 

आम्ही तुम्हाला अटल पेन्शन योजनेची माहिती देत आहोत. या योजनेत आतापर्यंत एक कोटी लोकांनी गुंतवणूक केली आहे. ही योजना 18 ते 40 वर्षाच्या व्यक्तींसाठी आहे. या योजनेत प्रवेश करण्यासाठी तुमच्याकडे बॅंकेच बचत खाते आणि आधार कार्ड असणे गरजेचे आहे. या योजनेत तुम्हाला 20 वर्ष योगदान द्यावे लागणार आहे. स्कीमच्या वेगवेगळ्या ब्रॅकेटनुसार 42 ते 1454 रुपये तुम्हाला दरमहा गुंतवणूक करावी लागणार आहे. तुम्ही 60 वर्षाचे झाल्यावर तुम्हाला सरकार दरमहा पेन्शन देईल.  

 

 

कसा घ्याल योजनेचा लाभ 

 

दरमहा 84 रुपये जमा केल्यास
जर तुम्ही 18 वर्षांचे झाले असाल तर दरमहा 84 रुपयांच्या बचतीचा प्लॅन करु शकता. 18 व्या वर्षी तुम्ही गुंतवणूक सुरु केल्यास तुम्हाला 60 व्या वर्षापर्यंत दरमहा 84 रुपये जमा करावे लागतील. 60 व्या वर्षापासून तुम्ही जीवत असेपर्यंत तुम्हाला वार्षिक 24 हजार रुपयांची पेन्शन मिळेल. 

 

दरमहा 210 रुपये जमा केल्यास

तुम्ही जर 18 वर्षाचे असाल आणि तुम्ही दरमहा 210 रुपयांची बचत केल्यास तुम्हाला वयाच्या 60 व्या वर्षापासून जीवंत असेपर्यंत वार्षिक 60 हजार रुपयांची पेन्शन मिळेल.

 

दरमहा 168 रुपये जमा केल्यास 

तुम्ही जर 18 वर्षाचे असाल आणि तुम्ही दरमहा 68 रुपये जमा केले तर तुम्हाला वयाच्या साठाव्या वर्षापासून वार्षिक 48 हजार रुपयांची पेन्शन मिळेल. 

 

दरमहा 42 रुपयांची बचत केल्यास
18 व्या वर्षापासून तुम्ही दरमहा 42 रुपयांची बचत केल्यास तुम्हाला वयाच्या साठाव्या वर्षापासून वार्षिक 12 हजार रुपये पेन्शन मिळेल. 


   


Loading...

Recommended


Loading...