Loading...

Sensexचा नवा विक्रम, प्रथमच ओलांडली 37 हजारांची पातळी, निफ्टीही 11171 च्या विक्रमी उंचीवर

गुरुवारी सेन्सेक्सने प्रथमच 37 हजारांचा टप्पा ओलांडला. तर निफ्टीनेही विक्रमी 11,171 ची पातळी गाठत सुरुवात केली.

Divya Marathi Jul 26, 2018, 10:58 IST

मुंबई - सेन्सेक्सने या आठवड्यात आणखी एक विक्रमी आणि ऐतिहासिक कामगिरी केली आहे. गुरुवारी सेन्सेक्सने प्रथमच 37 हजारांचा टप्पा ओलांडला. तर निफ्टीनेही विक्रमी 11,171 ची पातळी गाठत सुरुवात केली. शेअर मार्केटमधील तेजीचे वातावरण गुरुवारीही कामय राहण्याची शक्यता आहे. 


शेअर मार्केट बुधवारीही विक्रमी पातळीवर बंद झाले होते. या आठवड्यात सलग तिसऱ्या दिवशी विक्रमी टप्प्यावर सेन्सेक्स पोहोचला. निफ्टीमध्ये फार तेजी पाहायला मिळाली नव्हती. मात्र गुरुवारी सेन्सेक्स आणि निफ्टी अशा दोन्ही शेअर मार्केटची सुरुवात विक्रमी पातळी गाठत झाली. पीएनबी हाऊसिंग, अंबुजा सिमेंट, डीबीएल, भारती एअरटेल, एसबीआय, आयटीसी यांच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. 


Loading...

Recommended


Loading...