Loading...

Share Market विक्रमी उंचीवर:सेन्सेक्स प्रथमच 36500 पार, क्रूड ऑईलमध्ये घसरणीचा परिणाम

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरल्याने या कंपन्यांसाठी आयात स्वस्त होणार आहे. त्यामुळे त्यांचे शेअर वधारले.

Divya Marathi Jul 12, 2018, 11:32 IST

मुंबई - शेअर बाजाराने गुरुवारी विक्रमी उंची गाठली. सेन्सेक्स 36424.23 वर सुरू झाला तर व्यवसायादरम्यान 36540.39 पर्यंतची पातळी गाठली. यापूर्वीची सेन्सेक्सची विक्रमी पातळी 36,443.98 आहे. 29 जानेवारीला ही पातळी गाठली होती. निफ्टीने 11,006.95 पासून सुरुवात करत 11,030.85 ची विक्रमी पातळी गाठली. 1 फेब्रुवारी  2018 नंतर प्रथमच निफ्टीने 11 हजारची पातळी ओलांडली आहे. एका रिपोर्टनुसार कच्च्या तेलाचे दर घसरल्याने शेअर बाजारात तेजी आली आहे. निफ्टी यावर्षी जास्तीत जास्त 11,200-11,300 दरम्यान तर कमीत कमी 9,500-10,000 दरम्यान राहू शकतो. 


बँकिंग सेक्टरच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. यस बँकेचे शेअर्स 2% टक्क्यांनी वाढले आहेत. SBI, ICICI, अॅक्सिस आणि इंडसइंड बँकांच्या शेअर्सनेही 1.5% उसळी घेतली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये 2% हून जास्त वाढ नोंदवण्यात आली आहे. 


क्रूड ऑईल स्वस्त झाल्याने ऑइल कंपन्यांचे शेअर्स वधारले 
हिंदुस्तान पेट्रोलियमचे शेअर 4 टक्क्यांनी वधारले. आयओसी आणि बीपीसीएलचे शेअर्स 3 टक्क्यांपेक्षा जास्तने वधारले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरल्याने या कंपन्यांसाठी आयात स्वस्त होणार आहे. त्यामुळे त्यांचे शेअर वधारल्याचे दिसत आहे. 

 


Loading...

Recommended


Loading...