Loading...

उत्पन्न एक लाख असो अथवा 10 लाख , हे रेकॉर्ड ठेवणे आहे गरजेचे

तुमचे उत्पन्न वर्षाला एक लाख रुपये असो अथवा 10 लाख तुम्हाला तुमच्या उत्पन्नाचे रेकॉर्ड मेन्टेन करावे लागणार

Divya Marathi Apr 03, 2018, 16:54 IST

नवी दिल्ली- तुमचे उत्पन्न वर्षाला एक लाख रुपये असो अथवा 10 लाख तुम्हाला तुमच्या उत्पन्नाचे रेकॉर्ड मेन्टेन करावे लागणार आहे. केंद्र सरकार तुम्हाला विचारु शकते की, तुमच्या उत्पन्नाचा स्त्रोत काय आहे? त्यामुळे तुमच्या उत्पन्नाचा स्त्रोत काय आहे याचा पुरावा तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. तुम्ही तसे करु न शकल्यास तुम्ही कायदेशीर प्रक्रियेत अडकु शकता.

 

 

का गरजेचे आहे, उत्पन्नाचे रेकॉर्ड मेन्टेन करणे
इन्कम टॅक्स विभागानुसार इन्कम टॅक्स अॅक्टनुसार तुम्हाला कुठूनही उत्पन्न मिळत असले तरी सोर्सचे रेकॉर्ड मेन्टेन करणे गरजेचे आहे.

 

 

वर्षाला अडीच लाख रूपये उत्पन्न असणाऱ्यांना इन्कम सोर्सचे रेकॉर्ड आवश्यक
जर तुमचे वर्षाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक असेल तर तुम्हाला इन्कमच्या सोर्सचे रेकॉर्ड ठेवणे गरजेचे आहे. अशा व्यक्तींसाठी इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करणेही गरजेचे आहे. रिटर्न फाइल न करणाऱ्यांना सरकार विचारू शकते की तुमचे उत्पन्न किती आहे आणि ते कुठून आले आहे. याशिवाय इन्कम टॅक्स डिपार्टमेंट नोटीस बजावून विचारु शकते की इन्कम टॅक्स रिटर्न का फाइल केले नाही.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी माहिती


Loading...

Recommended


Loading...