Loading...

अवघ्या 2 तासात नाशिककर दिल्लीत; उडान योजनेअंतर्गत नाशिक-दिल्ली विमानसेवा सुरु

उडान योजनेअंतर्गत नाशिक-दिल्ली विमानसेवा आजपासून सुरु झाली आहे. जेट एअरवेजचे वरिष्ठ उपाध्यक्ष राज शिवकुमार यांच्या

Divya Marathi Jun 16, 2018, 11:06 IST

नवी दिल्ली- उडान योजनेअंतर्गत नाशिक-दिल्ली विमानसेवा सुरु झाली आहे. जेट एअरवेजचे वरिष्ठ उपाध्यक्ष राज शिवकुमार यांच्या हस्ते नाशिक-दिल्ली उडान सेवेचे उद्घाटन करण्यात आले. सोमवार, बुधवार, शुक्रवार असे आठवड्यातून तीन दिवस ही सेवा सुरु असणार आहे.

 

 

 

या सेवेमुळे नाशिक-दिल्ली अंतर आता अवघ्या 2 तासात गाठता येणार आहे. 2800 ते 3100 रूपयांपर्यंत या विमानसेवेचे दर असणार आहेत. नाशिक एअरपोर्टवरुन पहिल्यांदाच बोईंग विमानाद्वारे सेवा उपलब्ध होत असून जेट एअरवेजचे बोईंग 737 या विमानाद्वारे दिल्लीसाठी सेवा मिळणार आहे.


Loading...

Recommended


Loading...