Loading...

मोबाईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास आता करा या नंबरवर तक्रार

मोबाईल फोन हरवला अथवा चोरीला गेल्यावर तुम्ही नाराज होता. तुम्ही पोलिसांकडे तक्रार दिली तरी तुमचा फोन सापडण्य

Divya Marathi May 13, 2018, 13:48 IST

नवी दिल्ली- मोबाईल फोन हरवला अथवा चोरीला गेल्यावर तुम्ही नाराज होता. तुम्ही पोलिसांकडे तक्रार दिली तरी तुमचा फोन सापडण्याची शक्यता जवळपास नसते. या कटकटीपासून आता तुमची सुटका होण्याची शक्यता आहे. दुरसंचार विभाग यासाठी आता एक तरतुद करणार आहे. सरकार एक हेल्पलाईन नंबर यासाठी सुरु करणार आहे. 14422 हा तो क्रमांक असणार आहे. या नंबरवर तक्रार करुन तुम्ही तुमचा फोन हरविल्याचे सांगू शकता.

 

 

तक्रार दाखल केल्यानंतर लगेच तपास सुरु
14422 नंबर डायल करुन तुम्ही संदेश पाठविल्यावर तक्रार दाखल होणार आहे. त्यानंतर फोन हरविल्याची सूचना संबंधित पोलिसांना आणि सेवा प्रदान कंपनीला देण्यात येईल. यामुळे तुमचा हरवलेला फोन हरविण्यासच मदत होणार नाही तर तुम्हाला विमा मिळण्यासही मदत होणार आहे. कारण तक्रार दाखल केल्यानंतर तुम्हाला एफआरआय कॉपीसाठी फिरण्याची गरज नाही.

 

 

महाराष्ट्र सर्कलमध्ये सगळ्यात पहिली सुविधा
दूरसंचार विभागाकडून महाराष्ट्र सर्कलमध्ये सगळ्यात पहिली ही सेवा सुरु करण्यात येणार आहे. देशातील अन्य 21 दुरसंचार सर्कलमध्ये डिसेंबरअखेर ही सेवा सुरु होईल. या प्रकल्पाचे नाव सेट्रल इक्विपमेंट आयडेंटी रजिस्टर (CIIR) असे असणार आहे. दूरसंचार विभागाद्वारे तयार करण्यात येणार या रजिस्टरमध्ये प्रत्येक नागरिकांच्या मोबाईलची माहिती असणार आहे.

 

 

पुढे वाचा: तक्रार केल्यानंतर काय घडेल...

 


Loading...

Recommended


Loading...