Loading...

Underground तेल साठे करतेय मोदी सरकार; युद्ध सदृश्य परिस्थितील मोठ्या कामाचे

पीएम नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकारने ओडिशा आणि कर्नाटकात जमीनीखाली कच्च्या तेलाचे साठे बनवण्यास तत्वतः मंजुरी दिली

Divya Marathi Jun 30, 2018, 17:56 IST

नवी दि‍ल्‍ली - पीएम नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकारने ओडिशा आणि कर्नाटकात जमीनीखाली कच्च्या तेलाचे साठे बनवण्यास तत्वतः मंजुरी दिली आहे. हे स्टोरेज तयार झाल्यानंतर भारताकडे 22 दिवस चालेले इतके आपातकालीन इंधन स्टॉक असेल. परदेशातून कच्च्या तेलाचा पुरवठा थांबल्यास, किंवा युद्ध झाल्यास देशात इंधनाचा तुटवडा भासू नये यासाठी ही तयारी मोदी सरकारकडून केली जात आहे.

 

इतकी आहे क्षमता
या दोन्ही स्ट्रॅटेजिक पेट्रोमि‍यम रि‍झर्व (SPR) धोरणात्मक पेट्रोलियम साठ्यांची क्षमता 65 लाख मॅट्रि‍क टन (MMT) आहे. भारताकडे पूर्वीपासूनच अशा प्रकारचे 3 ठिकाणी साठे आहेत. त्यातील वि‍शाखापट्टनम (1.33 MMT), मंगळूर (1.5 MMT) आणि पदूर (2.5 MMT) असे एकूण 5.33 MMT स्‍टोरेज आहे.
 

नेमके काय आहे हे...
ऑइल कंपन्यांकडे क्रूड ऑइल आणि पेट्रोलि‍यम प्रोडक्‍ट्स व्यतिरिक्त स्‍ट्रॅटेजि‍क रिझर्व ऑइलसाठी स्टोरेज फॅसिलिटी बनवल्या जातात. क्रूड ऑइल स्‍टोरेज जमीनीखाली दगडांमध्ये बनवले जातात. दगडांच्या या गुहा मानवनिर्मित असतात. या हाइड्रोकार्बन गोळा करण्यासाठी सर्वात सुरक्षित मानल्या जातात. 
 

का बनवले जातात अंडरग्राउंड स्टोरेज?
युद्धाच्या काळात किंवा इतर कुठल्याही कारणास्तव कच्च्या तेलाच्या पुरवठा बंद होऊ शकतो. भविष्यामध्ये असे अडथळे आल्यास त्याचा सामना करण्यासाठी ही पूर्व तयारी आहे. जेणेकरून संकट काळात सुद्धा भारतात ऊर्जा सुनिश्चित केली जाऊ शकेल. हे सर्व साठे इंडि‍यन स्‍ट्रॅटेजि‍क पेट्रोलि‍यम रि‍झर्व लि‍मि‍टेड SPR कडून मॅनेज केले जातात. 

 

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, प्रथम कुणी आणि का मांडली ही संकल्पना


Loading...

Recommended


Loading...