Loading...

Oppo चा Realme 1 स्‍मार्टफोन भारतात लॉन्‍च, 8990 रुपयांपासून किंमत सुरू

ओप्पोने मंगळवारी आपल्या नव्या सिरीज रियलमीमधील पहिला स्मार्टफोन रियलमी 1 लॉन्च केला आहे. फोनमध्ये 6 जीबी रॅम

Divya Marathi May 16, 2018, 12:17 IST

नवी दिल्ली- ओप्पोने मंगळवारी आपल्या नव्या सिरीज रियलमीमधील पहिला स्मार्टफोन रियलमी 1 लॉन्च केला आहे. फोनमध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, हा एक मेड इन इंडिया फोन आहे. फोनची रॅम आणि स्टोरेजच्या आधारावर हा फोन तीन वॅरिएंटसमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. या फोनची सुरुवातीची किंमत 8990 रुपये ठेवण्यात आली आहे. 

 

 

काय आहे किंमत आणि कधी सुरु होणार विक्री
रियल मी 1 स्मार्टफोनच्या 6 जीबी रॅम/128 जीबी स्टोरेज वॅरियंटची किंमत 13,990 रुपये आहे. तर 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज वॅरिएंटची किंमत 8,990 रुपये आहे. हे फोन एक्सक्युसिव्हली अमेझॉन इंडियावर उपलब्ध आहेत. याशिवाय एक महिन्यानंतर 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज वॅरिएंटला मूनलाईट सिल्वर आणि डायमंड ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या वॅरिएंटची किंमत 10,990 रुपये असेल. फोनचा पहिला सेल 25 मे रोजी दुपारी 12 वाजता असेल. हा फोन सोलर रेड आणि डायमंड ब्लॅक कलरमध्ये मिळेल.  

 

 

ही आहे लॉन्च ऑफर
जिओ ग्राहकांना फोन खरेदीवर 4850 रुपयापर्यंतचा फायदा मिळेल. ओप्पोने रियलमी 1 साठी एसबीआयसोबत समझोता केला आहे. एसबीआय कार्डद्वारे पेमेंट केल्यास ईएमआय ट्रान्झॅक्शनवर 5 टक्के कॅशबॅक मिळेल. याशिवाय नो कॉस्ट ईएमआय ऑफर आहे. कंपनी फोनसोबत मोफत कव्हरही देत आहे. 

 

रियल मी 1 स्पेसिफिकेशन    डिस्प्ले : 6 इंच फुल एचडी प्‍लस स्‍क्रीन  रॅम -  3/ 4/ 6 जीबी  स्टोरेज - 23/ 64/ 128 जीबी (256 जीबी एक्‍सपेंडेबल) अॅन्ड्रॉयड - 8.1 ओरियो  बॅटरी -  3410 एमएएच कॅमेरा -  13 MP  फ्रंट कॅमरा - 8 MP  प्रोसेसर - एआई मीडियाटेक हीलियो पी 60 चि‍पसेट  किंमत - एस 9 : 57,900 रुपये, एस 9+ : 64,900 रुपये 


Loading...

Recommended


Loading...