Loading...

Mobiistar ने भारतात लॉन्‍च केले XQ Dual आणि CQ, 4999 रुपये आहे सुरुवातीची किंमत

स्मार्टफोन कंपनी Mobiistar ने भारतात XQ Dual आणि CQ स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. दोन्ही स्मार्टफोन सेल्फी फोक

Divya Marathi May 25, 2018, 00:03 IST

नवी दिल्ली- स्मार्टफोन कंपनी Mobiistar ने भारतात XQ Dual आणि CQ स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. दोन्ही स्मार्टफोन सेल्फी फोकस आहेत. व्हिएतनामची कंपनी मोबीस्टारचा दावा आहे की त्यांच्या ग्राहकांचा सेल्फीचा अनुभव शानदार असेल. कंपनीने फोनमध्ये ब्यूटी फिल्टरही दिला आहे. तो स्क्रीनला ब्राईट आणि सॉफ्ट करण्यास मदत   करेल. दोन्ही मोबीस्टार मॉडेलचा सेल एक्सक्लूसिव्ह सेल 30 मे रोजी फ्लिपकार्टवर सुरु होईल.

 

 

काय आहे किंमत आणि लॉन्च ऑफर
कंपनीने XQ Dual ची किंमत 7,999 रुपये ठेवली आहे. याची विक्री फ्लिपकार्टवर 30 मे रोजी दुपारी 12 वाजता सुरु होईल. तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला 1,000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. याशिवाय हा स्मार्टफोन मोबाईल प्रोटेक्शन सोबत येतो. ज्यात स्क्रीन डॅमेज, लिक्विड डॅमेज सामील आहे. हे सगळे यूजरला 99 रुपयांमध्ये मिळेल.

 

 

XQ Dual चे स्पेसिफिकेशन 


डिस्प्ले- 5.5 इंचाचा फुल एचडी+ आईपीएस डिस्प्ले 
रॅम- 3 जीबी 

स्टोरेज -  32 जीबी (128 जीबीपर्यंत अॅक्‍सपॅन्डेबल)    अॅन्ड्रॉइड - 7.1.2 नूगा   बॅटरी - 3000 mAh कॅमेरा - 13 MP डुअल टोन एलईडी फ्लॅशसोबत फ्रंट कॅमेरा  - 13+8 MP डुअल सेल्‍फी सेटअप   प्रोसेसर - क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 430 चि‍पसेट 

 

पुढे वाचा : CQ मध्ये काय आहे खास 


Loading...

Recommended


Loading...