Loading...

Jio Keypad मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट, युवकाचा पाय भाजला; कधीच करू नका या 5 चुका...

राजस्थानच्या श्रीगंगानगर येथे एका तरुणाच्या खिशात ठेवलेल्या Jio कीपॅड मोबाईलच्या बॅटरीचा ब्लास्ट झाला.

Divya Marathi Jul 30, 2018, 10:42 IST

गॅजेट डेस्क - राजस्थानच्या श्रीगंगानगर येथे एका तरुणाच्या खिशात ठेवलेल्या Jio कीपॅड मोबाईलच्या बॅटरीचा ब्लास्ट झाला. यात त्याचा पाय भाजला आहे. आग इतकी लागली होती, की त्याला जवळच्या नाल्यात उडी घेऊन ती विझवावी लागली. युवकाने सांगितल्याप्रमाणे, सुरुवातीला पॅन्टच्या खिशात मोबाईलला आग लागली यानंतर स्फोट झाला. पीडित युवक मजुरी करतो आणि त्याचे वडील आधीच गेल्या 15 दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत आहेत. या घटनेवरून मोबाईलमध्ये वापरल्या जाणाऱ्या बॅटरी आणि ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा प्रकारचे सर्वच मोबाईल ब्लास्ट टाळता येत नाही. परंतु, काही वेळा योग्य काळजी घेतल्यास अपघात टळू शकतो. 


बॅटरी ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 3 संकेत
- फोनची स्क्रीन ब्लर किंवा स्क्रीन पूर्णपणे काळी पडणे.
- फोन पुन्हा-पुन्हा हँग होऊन प्रोसेसिंग स्पीड धिमी होणे.
- बोलताना फोन सामान्यपेक्षा अधिक गरम होणे.


करू नका या 5 चुका
1. फेक चार्जर, फेक बॅटरी वारू नये. ज्या ब्रॅन्डचा फोन वापरता त्याच ब्रॅन्डचे चार्जर वापरावे.
2. पिन भिजलेली असताना फोन चार्जिंगवर लावू नये. चार्जिंग सुरू असताना फोन वापरू नये.
3. बॅटरी डॅमेज झाल्यास वेळीच नवीन बॅटरी एक्सचेंज करून घ्यावी.
4. अतीशय गरम तापमानात फोन वापरू नये.
5. मोबाइल कधीही 100% चार्ज करू नये. 100% चार्ज केल्यास बॅटरी खराब होऊ शकते. मोबाइलची बॅटरी नेहमी 80 ते 85% पर्यंत चार्ज करावी.


अशी घ्या बॅटरीची काळजी...
- रात्रभर मोबाईल चार्जिंगवर ठेवू नये. अशात बॅटरी लवकर खराब होऊ शकते. सोबतच मोबाईलचे परफॉर्मंस सुद्धा खराब होऊ शकते. ओरिजनल चार्जर न वापरल्यास बॅटरी स्लो चार्जिंगची समस्या येऊ शकते. 
- मोबाईलची बॅटरी नेहमीच 20 टक्के पेक्षा कमी झाल्यानंतरच चार्जिंगवर लावावी. 20% पेक्षा अधिक असतानाही वारंवार चार्जिंग करू नये.
- मोबाईल एखाद्या गरम वस्तूवर ठेवून चार्ज केल्यास बॅटरी तापू शकते. अशात बॅटरी आणि मोबाईल दोन्ही खराब होऊ शकतात.


Loading...

Recommended


Loading...