Loading...

Whatsapp द्वारेही करता येणार ग्रुप व्हिडिओ आणि व्हाइस कॉलिंग, एकावेळी बोलू शकतील चार जण

नुकतेच इन्स्टाग्राममध्येही हे फिचर सुरू करण्यात आले होते. त्यातही एकाचवेळी चार जणांना बोलता येते.

Divya Marathi Jul 31, 2018, 14:33 IST

गॅझेट डेस्क - इन्सटंट मॅसेजिंग अॅप व्हाट्सअपने अँड्रॉइड आणि आयओएस यूझर्ससाठी ग्रुप व्हिडिओ आणि व्हाइस कॉलिंगचे फिचर जारी केले आहे. व्हाट्सअॅपच्या ब्लॉग पोस्टनुसार यूझर्सना यामुळे एकाचवेळी चार जणांना एकत्र व्हिडिओ किंवा व्हाइस कॉल करता येईल. 


यासाठी यूझरला सर्वात आधी व्हाट्सअॅप अपडेट करावे लागेल. त्यानंतर एखाद्या व्यक्तीला व्हिडिओ किंवा व्हाइस कॉल करा. कॉल कनेक्ट झाल्यानंतर मोबाईलच्या ुजव्या बाजुला असलेल्या अॅड पार्टिसिपेंटवर टॅप करून आणखी तीन जणांना यात कनेक्ट करता येते. ग्रुप व्हिडिओ आणि व्हाइस कॉल पूर्णपणे एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असेल. म्हणजे यात पाचव्या व्यक्तीला हस्तक्षेप करता येणार नाही. 


2014 मध्ये सुरू झाले होते व्हाइस कॉलिंग 
व्हाट्स अॅपने 2014 मध्ये व्हाइस कॉलिंग फिचर सुरू केले होते. त्यानंतर 2016 मध्ये व्हिडिओ कॉलिंग सुरू करण्यात आले होते. कंपनीचटा दावा आहे की, त्यांचे यूझर एका दिवसांत दोन अब्ज मिनिटांचे कॉलिंग करतात. 

 


Loading...

Recommended


Loading...