Loading...

पाणीपुरी बडोद्यात बॅन पण यामुळे बदलली या व्यक्तीची LIFE; पाणीपुरी विकण्यासाठी सोडला इन्फोसिस जॉब

पावसाळी वातावरणातील आजारांच्या प्रकोपापासून दूर राहण्यासाठी गुजरातच्या बडोदामध्ये पाणीपुरी विक्रीवर बंदी घालण्यात आली आह

Divya Marathi Jul 30, 2018, 13:06 IST

इंदूर : पावसाळी वातावरणातील आजारांच्या प्रकोपापासून दूर राहण्यासाठी गुजरातच्या बडोदामध्ये पाणीपुरी विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. काही दिवसांमध्ये संपूर्ण राज्यात ही बंदी लागू होईल. आज आम्ही तुम्हाला अशा एका व्यक्तीबद्दल सांगत आहोत, ज्याने पाणीपुरी विकण्यासाठी इन्फोसिससारख्या मोठ्या कंपनीतील जॉब सोडला. इंदूर येथील प्रशांत कुलकर्णी यांच्या पाणीपुरी ब्रँड 'चटर-पटर'ची देशभरात डिमांड आहे. सध्या या कंपनीचा टर्नओव्हर 80 कोटी रुपये आहे. प्रशांतच्या या स्टार्टअपची कथा अत्यंत रोचक आहे. 


जाणून घ्या, कशी झाली सुरुवात...
- Infosys मध्ये काम करताना प्रशांतला एकदा रस्त्यावरील पाणीपुरी खाल्ल्यामुळे विषबाधा झाली होती.
- पत्नी आरती कुलकर्णीने सांगितले की, यामुळे प्रशांतला त्यांच्या फेव्हरेट पाणीपुरीपासून चार महिने दूर राहावे लागले.
- आजारातून ठीक झाल्यानंतर काही महिन्यांनी आम्ही हा बिझनेस करण्याचा विचार केला आणि संपूर्ण देशात फिरून स्ट्रीट फूड सलेक्ट केले.
- ऑक्टोबर, 2011 मध्ये 'चटर-पटर' स्टार्टअपची सुरुवात झाली. आज कुलकर्णी कपल स्ट्रीट फूड्सला हायजिनिक रूपात लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे.
- 'चटर-पटर' ची सुरुवात इंदूरपासून झाली होती परंतु आज हा ब्रँड पोरबंदर, जामनगर, राजकोट, विशाखापट्टणम, राजस्थान आणि महाराष्ट्रात पोहोचला आहे.


कुटुंबीयांनी केला नव्हता सपोर्ट
- प्रशांतने एमबीए केले असून पत्नी एमटेक आहे. प्रशांत सांगतात की, आम्ही घरच्यांसमोर या बिझनेसची कल्पना मांडल्यानंतर सर्वांनी हा बिझनेस चालणार नाही असे सांगितले.
- आमच्या निर्णयाला घरच्यांनी सपोर्ट केला नाही. आम्हाला हेसुद्धा माहिती होते की, आर्थिक सपोर्टशिवाय बिझनेस चावले सोपे जाणार नाही.


आता 80 कोटींचा आहे टर्नओव्हर 
- 30 हजार रुपयात सुरु झालेल्या या बिझनेसचा टर्नओव्हर सध्या 80 कोटीपर्यंत पोहोचला आहे.
- विविध रिसर्च केल्यानंतर कुलकर्णी कपलने पाणीपुरीचे 112 फ्लेवर तयार केले आहेत.
- 'चटर-पटर' मध्ये पाणीपुरी व्यतिरिक्त बर्गर, पास्ता यासारखे 250 पेक्षा जास्त प्रोडक्ट आहेत.
- देशातील मोठ्या शहरांमध्ये 'चटर-पटर' चे 100 पेक्षा जास्त स्टोअर्स आहेत.


Loading...

Recommended


Loading...