Loading...

पावसाळ्यात गाडीचे टायर पंक्चर आणि स्लिप होणार नाही, फक्त करावे लागतील हे काम

सध्या पावसाळ्याचे दिवस असून काही ठिकाणी ठिकाणी पाऊस, चिखल, जलमय स्थिती पाहण्यास मिळत आहे.

Divya Marathi Jul 24, 2018, 16:55 IST

सध्या पावसाळ्याचे दिवस असून काही ठिकाणी ठिकाणी पाऊस, चिखल, जलमय स्थिती पाहण्यास मिळत आहे. अशा परिस्थितीमध्ये गाडी चालवणेसुद्धा अवघड झाले आहे. उन्हाळा आणि हिवाळ्याच्या तुलनेत पावसाळ्यात निसरडा रस्त्याची समस्या जास्त होते. यामुळे टुव्हीलर आणि फोरव्हीलर वाहन स्लिप होण्याच्या घटना वाढतात. एवढेच नाही तर पावसाळ्यात तयार पंक्चर होण्याचा धोका वाढतो. परंतु काही विशेष गोष्टींकडे लक्ष दिल्यास गाडी स्लिप आणि पंक्चर होण्याची शक्यता कमी राहते.


टायर पंक्चर होण्याचे कारण
पावसाळ्यात रस्त्यावर पाणी जमा होते. वाहते पाणी आपल्यासोबत विविध प्रकारच्या वस्तू घेऊन येते आणि यामध्ये काही टोकदार वस्तूही असतात. गाडी रस्त्यावरून जात यावरून जाते आणि टायर पंक्चर होण्याची शक्यता वाढते. रस्त्यांवरील दगड आणि खादीचे तुकडेही अनेकवेळा टायर खराब करतात. गाडीचे टायर जास्त झिजलेले असल्यास ते लवकर पंक्चर होतात. यामुळे टायर तपासून घ्यावेत.


का स्लिप होते गाडी...
ओल्या रस्त्यांवर वाळू, छोटे-छोटे दगड आणि खडी पडलेली असते आणि यामुळे गाडी स्लिप होते. यामुळे अपघताही होतात. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे टायरची ग्रीप कमजोर होते. अशावेळी गाडी जास्त स्पीडमध्ये असल्यास ब्रेक लावताच स्लिप होते.


बचावासाठी या आहेत एक्स्पर्ट टिप्स...
गाडीचे टायर्स झिजलेले नसावेत. एक्स्पर्टसनुसार टायरमध्ये 3mm चे थ्रेडस असणे आवश्यक आहे कारण रोडवर यांची ग्रीप चांगली राहते. टायरमध्ये हवेचे प्रेशर योग्य नसेल तर पंक्चर होण्याची शक्यता जास्त वाढते. एवढेच नाही तर गाडी स्लिपसुद्धा होऊ शकते. यामुळे कंपनीने रिकामेंड केलेल्या प्रेशरनुसार टायरमध्ये हवा असावी.


सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पावसाळ्यात गाडीची स्पीड कमी ठेवावी. या दिवसांमध्ये गाडीची स्पीड 40kmph ठेवावी आणि हायवेवर गाडीची स्पीड 70-80 kmph असावी. यामुळे तुमची गाडी कंट्रोलमध्ये राहील.


Loading...

Recommended


Loading...