Loading...

आता बाजारात येणार बजाजची QUTE, 1.28 लाख किंमत, 36 चे मायलेज

मागील सहा वर्षापासून सरकारी फायलींमध्ये अडकून पडलेली बजाजची क्‍यूट (Qute) लवकरच तुम्हाला रस्त्यावर धावताना द

Divya Marathi Jun 03, 2018, 00:01 IST

नवी दिल्ली- मागील सहा वर्षापासून सरकारी फायलींमध्ये अडकून पडलेली बजाजची क्‍यूट (Qute) लवकरच तुम्हाला रस्त्यावर धावताना दिसणार आहे. ही कार बाजारात दाखल झाल्यावर quadricycle कॅटेगिरीच नव्हे तर भारतीय वाहन क्षेत्रात ट्विस्ट येईल असे म्हटले जात आहे. केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालयाने quadricycle च्या व्यावसायिक वापराशी निगडित पॉलिसीच्या ड्राफ्टला मंजूरी दिली आहे. सध्या या कॅटेगिरीत केवळ बजाजची क्यूटच उपलब्ध असणार आहे. quadricycle  कॅटेगिरीच्या मंजूरीसाठी लवकरत नोटिफिकेशन येणार आहे. नोटिफिकेशन आल्यानंतर बजाजला आपल्या या अतिशय माफक किंमतीमधील कारला भारतीय बाजारात विकण्याची परवानगी मिळणे सोपे जाणार आहे.

 

 

बजाज ऑटोने 2012 मध्ये दि‍ल्‍ली ऑटो शोमध्ये RE60 नावाने ही कार सादर केली. ही कार अनेक आशियाई देशात चांगली लोकप्रिय झाली आहे. कमी किंमत आणि जास्त मायलेज असल्याने तिची प्रतिक्षा अनेक भारतीय करत आहेत. 

 

 

प्रदूषणही करते अतिशय कमी
कंपनीचा दावा आहे की ही कार अतिशय कमी प्रदुषण करते. याचाच अर्थ ही कार अतिशय कमी सीओ2 उत्‍सर्जि‍त करते. या कारमध्ये 216.6 सीसीचे इंजिन असून ती पेट्रोलशिवाय सीएनजी आणि एलपीजी या पर्यायांमध्येही उपलब्ध असणार आहे. या गाडीचा जास्तीत जास्त वेग हा ताशी 70 कि‍लोमीटर असून पीक पॉवर 13.2 पीएस आहे. यात परफॉर्मस आणि कंट्रोलसाठी वॉटर कूल्ड डि‍जि‍टल ट्राय स्‍पोर्ट इग्‍नीशन 4 वॉल्‍व इंजिन लावण्यात आले आहे. या कारचे वजन 450 कि‍लोहून कमी आहे. 

 

 

पुढे वाचा: याचे आणखी काही फीचर्स... 
 

 


Loading...

Recommended


Loading...