Loading...

70 रुपयांच्या डेली बचतीवर खरेदी करा Royal Enfield Bike, 5 ऑप्‍शन्स

भारतात Royal Enfield चा सेल सातत्याने वाढत आहे. बजेटमुळे अनेक जण ही बाईक खरेदी करताना विचार करतात. अनेक बँका

Divya Marathi Jun 14, 2018, 12:02 IST

नवी दिल्ली- भारतात Royal Enfield चा सेल सातत्याने वाढत आहे. बजेटमुळे अनेक जण ही बाईक खरेदी करताना विचार करतात. अनेक बँकांकडून फायनान्सचा ऑप्शनही उपलब्ध आहे. Royal Enfield सुध्दा बँक आणि एनबीएफसीद्वारे फायनान्सची सुविधा उपलब्ध करुन देत आहे. 

 

 

Royal Enfield बाईकची किंमत 1.03 लाख रुपये ते 2.08 लाख रुपये (एक्‍स शोरूम दि‍ल्‍ली) आहे. अशात जर तुम्ही 5 वर्षासाठी 1 लाख रुपयांचे कर्ज घेतले तर तुमचा ईएमआय जवळपास 2,170 रुपये असेल. याचाच अर्थ तुम्ही केवळ 70 रुपये डेली बचत करुन रॉयल एनफील्‍ड खरेदी करु शकता. या कर्जासाठी प्रोसेसिंग फी वेगळी चार्ज करण्यात येते.

 

 

बुलेट 350
तुम्ही 10 टक्के व्याजदराने 1 लाख रुपयांचे कर्ज घेतल्यास तुम्हाला 70 रुपयांच्या दैनदिन बचतीवर बुलेट 350 खरेदी करता येऊ शकते. येथे तुम्हाला 13 हजार रुपयांचे डाउनपेमेंट करावे लागेल.

 

 

हे असे समजुन घ्या


किंमत : 1.03 ते 1.13 लाख रुपये (एक्‍स शोरूम) 
लोन अमाउंट : 1 लाख रुपये
व्याजदर : 10 टक्के
कर्जाचा कालावधी : 60 महिने
ईएमआय : 2124 रुपये 
दैनदिन बचत : 70 रुपये

 

पुढे वाचा...

 


Loading...

Recommended


Loading...