Loading...

Royal Enfield ला टक्कर द्यायला परत येतेय Jawa, याच वर्षी बाजारात उतरणार

आयकॉनि‍क Jawa मोटरसायकल्‍स भारतात महिंद्रा ग्रुप लाँच करणार आहे. आनंद महिंद्रा यांनी ट्वीटरवर ही माहिती दिली.

Divya Marathi Jul 03, 2018, 16:44 IST

नवी दि‍ल्‍ली - महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी नुकतेच ट्वीट करून भारतात Jawa ब्रँड लवकरच येणार असल्याची घोषणा केली. आयकॉनि‍क Jawa मोटरसायकल्‍स भारतात महिंद्रा ग्रुप लाँच करणार आहे. आनंद महिंद्रा यांनी नव्या Jawa बाईक्स कधीपर्यंत बाजारात येणार याबाबत निश्चित माहिती दिली नाही. त्यांनी नव्या मोटारसायकल लवकरच येणार असल्याचे ट्वीट केले. त्याशिवाय एका ट्वीटमध्ये त्यांनी नवीन बाईक याचवर्षी येणार असे म्हटले. 

 

Jawa ची स्पर्धा भारतात Royal Enfield बरोबर 
ट्वि‍टरवर एका फॉलोअरने महिंद्रा यांना म्हटले की, ते दोन वर्षांपासून Jawa ची वाट पाहत आहेत. त्यामुळे त्यांनी रॉयल एनफील्‍डही खरेदी केली नाही. त्यांनी ट्वीटरवर विचारले की, नवी Jawa बाइक 2018 मध्ये येईल की नाही. त्यावर महिंद्रा यांनी उत्तर दिले की, हे याच वर्षी होणार आहे. मात्र त्यांनी याबाबत फार माहिती दिली नाही. ही बाईक सणांच्या काळात 2018 च्या अखेरीस लाँच होऊ शकते. 

 
ब्रँड यूझ करण्याचा महिंद्राकडे अधिकार  
महिंद्राने क्‍लासि‍क लेजेंडद्वारे चेक रिपब्लिकची मोटरसायक‍ल कंपनी जावाबरोबर 'एक्‍सक्‍लुसिव्ह ब्रँड लाइसन्सिंग अॅग्रिमेंट' वर साइन केले आहे. सोप्या शब्दांत सांगायचे तर, महिंद्राने क्‍लासि‍क लेजेंड खरेदी केले आहे. त्यांच्याकडे BSA चे संपूर्ण शेअर आहेत. त्याशिवाय क्‍लासि‍क लेजेंडकडे जावाबरोबरच लायसन्सिंग अॅग्रिमेटही आहे. म्हणजे महिंद्राकडे हे ब्रँड्स वापरण्याचे अधिकार आहेत. 
 

पुढे वाचा.. आधीही मिळाले संकेत.. 

 


Loading...

Recommended


Loading...