Loading...

नव्या कारसाठी उद्यापासून मोजावी लागणार जास्त किंमत, कंपन्यांनी एवढी केली वाढ

महिद्रा अँड महिंद्राने 1 ऑगस्टपासून त्यांच्या काही गाड्यांची किमती 2 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे.

Divya Marathi Jul 31, 2018, 14:42 IST
फोटो-प्रतिकात्मक

बिझनेस डेस्क - महिद्रा अँड महिंद्राने 1 ऑगस्टपासून त्यांच्या काही गाड्यांच्या किमतींमध्ये 2 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे गाड्यांच्या किमती 30 हजारांपर्यंत वाढतील. इतरही काही कंपन्यांनी त्यांच्या कारच्या किमतींमध्ये वाढ केली आहे. मटेरियल कॉस्ट मध्ये झालेली वाढ हे किमती वाढण्याच्या मागचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. 

 

ह्युंडईची ग्रँड आय 10 ही महागली 
ह्युंडई मोटर इंडियाने त्यांची सर्वात प्रसिद्ध कार ग्रँड आय-10ची किंमत वाढवली आहे. कंपनीने जवळपास 3 टक्के किंमती वाढवल्या आहेत. 1 ऑगस्टपासून नव्या किमती लागू होतील. कंपनीने या कारची किंमत 4.73 लाखांपासून 7.51 लाख (एक्स-शोरूम, दिल्ली) एवढी ठेवली आहे. 


टाटाच्या गाड्यांच्या किमतीत 2.2 टक्के वाढ 
टाटा मोटर्सने त्यांच्या पॅसेंजर्स गाड्यांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. 2.2 टक्के एवढी ही वाढ असेल. गेल्या तीन महिन्यांत कंपनीने दुसऱ्यांदा किमती वाढवल्या आहेत. एप्रिल महिन्यात कंपनीने कारच्या किमती 60,000 रुपयांपर्यंत वाढवल्या होत्या. 

 

होंडा 
होंडा कार्स इंडियाच्या सर्व मॉडेल्सच्या किमतींमध्ये जवळपास 10,000 पासून 35000 पर्यंत वाढ होणार आहे. त्यामुळे होंडाच्या कार खरेदीसाठीही आता 1 ऑगस्टपासून अधिक किंमत मोजावी लागेल. 


Loading...

Recommended


Loading...