Loading...

चिमुकल्या अबरामने केले किंग खानचे बारसे, शाहरुखचा झाला 'शग्गू....'

बॉलिवूडमध्ये शाहरुखला किंग खान, बादशाह, एसआरके या नावांनी ओळखले जाते. आता नावांच्या या यादीमध्ये आणखी एका नावाची भर पडली आहे

Divya Marathi Feb 11, 2015, 03:00 IST
बॉलिवूडमध्ये शाहरुखला किंग खान, बादशाह, एसआरके या नावांनी ओळखले जाते. आता नावांच्या या यादीमध्ये आणखी एका नावाची भर पडली आहे. हे नवीन नाव त्याचा मुलगा अबरामने दिले असल्याने सध्या याची जोरदार चर्चा होत आहे. स्वत: शाहरुखने एका मुलाखती दरम्यान हा किस्सा सांगितला.   शाहरुखने सांगितले की, 'अबराम आता संपूर्ण घरामध्ये फिरत असतो. पप्पा..पप्पा.. करत बोलण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी तर माझे नाव घेण्याचा त्याचा प्रयत्न असतो. मात्र लहान असल्याने तो शाहरुख हे नाव घेऊ शकत नाही, मात्र त्याचा उच्चार शग्गू.. शग्गू असा होतो. त्यामुळे मला त्याचे खूप कौतुक वाटते.' सध्या शाहरुख आपल्या मुलाकडून मिळालेल्या नवीन नावामुळे आनंदी आहे.

Loading...

Recommended


Loading...