Loading...

49 वर्षीय शाहरुखसोबत झळकणार ही 22 वर्षीय तरुणी

बॉलिवूडची 22 वर्षीय अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच 49 वर्षीय अभिनेता शाहरुख खानसोबत काम करताना दिसणार आहे

Divya Marathi Aug 20, 2015, 12:02 IST
(फाइल फोटो- एका इव्हेंटमध्ये आलिया भट्ट आणि शाहरुख खान)   मुंबई- बॉलिवूडची 22 वर्षीय अभिनेत्री आलिा भट्ट लवकरच 49 वर्षीय अभिनेता शाहरुख खानसोबत काम करताना दिसणार आहे. दोघांची दिग्दर्शिका गौरी शिंदेच्या आगामी सिनेमासाठी त्यांना कास्ट करण्यात आले आहे. याविषयी निर्माता करण जोहरने माहिती दिली आहे.  त्याच्या सांगण्यानुसार, 'रेच चिलीज एन्टरटेन्मेंट आणि धर्मा प्रॉडक्शनच्या आगामी सिनेमात शाहरुख खान आणि आलिया भट्टला साइन करण्यात आले आहे.'   इतकेच नव्हे तर स्वत: आलियानेसुध्दा याविशयी टि्वट केले आहे. तिने सांगितले, 'Will no longer have any problem with my English Vinglish.. can't wait to be directed by Gauri Shinde with the man himself Shahrukh Khan!!!' सिनेमाचे टायटल आणि रिलीज डेट अद्याप घोषित करण्यात आलेली नाहीये.    शाहरुखसोबत रोमँटिक होणार नाही आलिया-  गौरी शिंदेच्या या सिनेमात आलिया आणि शाहरुख यांच्यात रोमान्स दिसणार नाहीये. सूत्रांच्या सांगण्यानुसार, 'ही एका वेगळ्या थाटणीची कथा असेल. याला तुम्ही लव्हस्टोरी नाही म्हणू शकत. कारण शाहरुख आणि आलिया एकमेकांच्या अपोजिट नाहीये. आलियाचा प्रियकर होण्यासाठी शाहरुख वयाने खूप मोठा आहे.'   सिनेमावर गतीने काम सुरु झाले आहेत. बुधवारी (18 ऑगस्ट) आलिया गौरीला भेटण्यासाठी खास स्थित तिच्या घरी पोहोचली होती. बातम्यांनुसार, हा एका तरुणीच्या कहाणीवर आधारित सिनेमा आहे. ती आपल्या आयुष्यात तीन लोकांना डेट करते आणि प्रत्येक नाते तिला तिच्या आयुष्यात वेगळा दृष्टीकोण देतो.        

Loading...

Recommended


Loading...