Loading...

नाना 2016मध्ये लव्ह स्टोरीचे करणार दिग्दर्शन

'अब तक छप्पन-२' द्वारे नाना पाटेकर इंडस्ट्रीमध्ये पुन्हा सक्रिय झाले आहेत. 27 फ्रेबुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होतोय.

Divya Marathi Feb 21, 2015, 12:09 IST
(अभिनेता नाना पाटेकर)
'अब तक छप्पन-२' द्वारे नाना पाटेकर इंडस्ट्रीमध्ये पुन्हा सक्रिय झाले आहेत. 27 फ्रेबुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होतोय. नाना या अॅक्शनपटानंतर दिग्दर्शन निर्मिती क्षेत्रातदेखील उतरणार आहे. याबाबत नानांनी सांगितले की, वि. वा. शिरवाडकरांच्या 'नटसम्राट' या नाटकाने मराठी रंगभूमीवर एक इतिहास घडवला होता. ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांनी साकारलेली ही भूमिका अजरामर झाली. आता हे नाटक पुनरुज्जीवित करण्याचा आमचा प्रयत्न असून 'नटसम्राट'ची नव्या रूपात नव्या कलाकारांसह आम्ही निर्मिती करणार आहोत.'   नानांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात रंगभूमीपासूनच केली होती. निर्मितीसोबतच आता नाना दिग्दर्शनातही सक्रिय होणार आहेत. 2016 मध्ये नाना दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसतील. या चित्रपटाची कथा ते स्वत: लिहिणार आहेत. आपल्या दिग्दर्शनामधील चित्रपटाबाबत बोलताना नानाने सांगितले की, 'माझ्या प्रत्येक चित्रपटाच्या दिग्दर्शनामध्ये माझा हस्तक्षेप राहतो, पण या चित्रपटात अधिकृतरीत्या मी दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे. हिंदी भाषेतील या चित्रपटामध्ये अनोखी प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. सध्या कथानकाचे काम अंतिम टप्प्यात आहे.' 
  दुसऱ्या महायुद्धानंतरच्या कथेवर हा चित्रपट आधारित असेल. एक वयोवृद्ध व्यक्ती ज्याला एका तरुणीवर प्रेम होते. मात्र, आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ती व्यक्ती आपल्यापासून दूर जाते, असे त्याला वाटत असते. युद्धामध्ये त्याच्या मित्राला गोळी लागते, त्यावेळी तो त्या मित्राची मदत करण्याऐवजी दगडाप्रमाणे निपचित उभा राहतो. त्याच्या प्रवासामध्ये मनाची होणारी घालमेल त्याला कुठे घेऊन जाते, हा सांगणारा तो चित्रपट आहे. 

Loading...

Recommended


Loading...