Loading...

मिथुनच्या मुलाच्या लग्नाचे First Pics; कोर्ट मॅरेजनंतर हिंदू रीति-रिवाजांनी झाला विवाह

मिमोह म्हणजेच महाक्षय चक्रवर्ती डायरेक्टर आणि प्रोड्यूसर सुभाष शर्मा यांची कन्या तथा अॅक्ट्रेस मदालसाशी लग्न केले.

Divya Marathi Jul 10, 2018, 15:50 IST

मुंबई - बलात्काराचा आरोपी महाक्षय मिमोह चक्रवर्तीचे लग्न मंगळवार हिंदू रुढी परमपरेनुसार विवाह संपन्न झाले आहे. त्याच्या या विवाहाचे काही फोटो नुकतेच समोर आले आहेत. यात अॅक्ट्रेस मदालसा आणि मिमोह लग्नाचा विधी करताना दिसत आहेत. तत्पूर्वी शनिवारीच कोर्टात जाऊन दोघांनीही कोर्ट मॅरेज केले होते. मिमोह म्हणजेच महाक्षय चक्रवर्ती डायरेक्टर आणि प्रोड्यूसर सुभाष शर्मा यांची कन्या तथा अॅक्ट्रेस मदालसाशी लग्न केले. मदालसाने 2009 मध्ये तेलुगु चित्रपट 'फिटिंग'मधून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. याशिवाय तिने कन्नड़ चित्रपट 'शौर्य'मध्येही काम केले आहे.


काय होते प्रकरण?
भोजपुरी चित्रपटांतील अॅक्ट्रेसच्या अर्जावरून दिल्लीच्या रोहिणी कोर्टाने सोमवारी मिमोहवर बलात्कार, गर्भपात करणे आणि फसवणूक, तसेच त्याची आई योगिता बालीविरुद्ध धमकी दिल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते. यानंतर दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला होता. शनिवारी दिल्लीच्या कोर्टातून दोन्ही आरोपींना अग्रीम जामीन देण्यात आला होता.


पुढील स्लाइड्सवर पाहा, या लग्नाचे आणखी काही फोटो...


Loading...

Recommended


Loading...