Loading...

मराठमोळी सोनाली कुलकर्णी आहे बोल्ड, पाहा अॅक्ट्रेसेसचा हैराण करणारा ड्रेसिंग सेन्स

बॉलिवूडमध्ये प्रियांका चोप्रापासून ते दीपिका पदुकोणपर्यंत बी टाऊनच्या नावाजलेल्या अभिनेत्री आपल्या ड्रेसमुळे चर्चा एकवटल

Divya Marathi Oct 15, 2017, 17:36 IST
मुंबई- बॉलिवूडमध्ये प्रियांका चोप्रापासून ते दीपिका पदुकोणपर्यंत बी टाऊनच्या नावाजलेल्या अभिनेत्री आपल्या ड्रेसमुळे चर्चा एकवटली आहे. मात्र त्यांची ही ड्रेसिंग स्टाइल कौतुकास्पद नव्हे तर हास्यास्पद ठरली. त्यांनी परिधान केलेल्या विचित्र ड्रेसमुळे अनेकदा या अभिनेत्रींची खिल्लीसुद्धा उडाली आहे. या अभिनेत्रींमध्ये एका मराठमोळ्या नावाचाही समावेश आहे. हिंदी, मराठीत आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारी मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्यावरसुद्धा तिच्या ड्रेसिंग सेन्सवरुन टीका झाला आहे.
खरं तर सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावताना सोनाली साड्यांना प्राधान्य देत असते. मात्र काही वेळा ती बोल्ड आउटफिटलाही पसंती दर्शवते. आता हेच बघा ना काही वर्षांपूर्वी 'सावरिया' या सिनेमाच्या प्रीमिअरला ब्लॅक कलरच्या ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये हजेरी लावून सोनालीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. सोनाली असेही आउटफिट परिधान करु शकते, हे त्यावेळी प्रथमच सर्वांना समजले होते. तिचा हा ड्रेस एवढा पारदर्शक होता, की त्यातून तिचे अंतर्वस्त्र स्पष्ट दिसले होते. तिने या ड्रेसची आयडिया कोठून घेतली, हे तर ठाऊक नाही, मात्र हा ड्रेस नक्कीच तिच्यावर शोभून दिसला नाही, असे म्हणता येईल.
बी टाऊनच्या अनेक अभिनेत्रींच्या फॅशनची उडाली आहे खिल्ली..
करीनाने 'गोरी तेरे प्यार में' या सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगला परिधान केलेल्या ड्रेसमुळे चांगलीच खळबळ उडाली होती. 'गदर' फेम अमिषा पटेल असो वा 'स्टुडंट ऑफ द इयर'द्वारे अभिनय करिअरचा श्रीगणेशा करणा-या आलिया भटचे फॅशन डिझास्टर चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला.   चला तर मग, पुढील स्लाईड्समध्ये बघुयात नावाजलेल्या अभिनेत्रींनी परिधान केलेले विचित्र ड्रेस...
 

Loading...

Recommended


Loading...