Loading...

भावाच्या सहमतीने बनवली पहिली ब्लू फिल्म; वाचा सध्या काय करतो Sunny Leone चा भाऊ

सनी लियोनने आपल्या भावाच्या सहमतीने पहिला पॉर्न शूट केला होता. तसेच तिने अॅडल्ट इंडस्ट्रीत आपल्याच भावाचे नाव चोरले आहे.

Divya Marathi Jul 28, 2018, 12:22 IST

मुंबई - पॉर्न स्टार ते बॉलिवुड सिलेब बनलेल्या सनी लियोनच्या आयुष्यावर आधारित वेब सिरीझ सध्या चर्चेत आहेत. यात तिने पॉर्न स्टार बनण्याचा प्रवास जगासमोर मांडताना स्वतः अॅकिंग केली. अॅडल्ट इंडस्ट्रीमध्ये येण्याचा निर्णय तिला परिस्थितीमुळे घ्यावा लागला होता. 1999 मध्ये कुटुंबीय कॅनडा सोडून लॉस एंजेलिसला राहायला गेले होते. त्याचवेळी तिला आपल्या वडिलांची नोकरी गेल्याचे कळाले होते. घराचा खर्च चालवण्यासाठी आईने ज्वेलरी गहाण ठेवली होती. सुरुवातीला वडिलांनी घरातील एक खोली 300 डॉलर दरमहा किरायाने देण्याचा निर्णय घेतला. परंतु, सनीला ही गोष्ट आवडली नाही. कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी तिने पॉर्न इंडस्ट्रीत पाऊल ठेवले. तिला पहिला अॅडल्ट चित्रपट 1999 मध्ये रक्षाबंधनाच्या अवघ्या काही दिवसांपूर्वी ऑफर करण्यात आला होता. 


भावाच्या सहमतीने शूट केला पहिला पॉर्न...
सनीने आपल्या पालकांना पॉर्न फिल्म करताना खोटे सांगितले होते. आपण एका प्रसिद्ध कपड्यांच्या ब्रँडसाठी मॉडेलिंग करत आहोत असे तिने म्हटले होते. हाच बहाणा करून तिने 3 दिवस घराबाहेर राहण्याची परवानगी घेतली. तिच्या वडिलांनी तू कमाई फक्त आपल्यासाठी कर असे म्हणत तिला परवानगी दिली होती. पालकांना काही सांगितले नसले, तरीही तिने आपल्या भाऊ संदीप बोहरा याला विश्वासात घेतले होते. संदीपलाच तिने सांगितले होते, की आपण एका सेमी पॉर्न फिल्ममध्ये काम करत आहोत. सुरुवातीला संदीपने नकार दिला. परंतु, घराच्या आर्थिक परिस्थितीचा दाखला दिल्यानंतर सनीने त्याचा होकार मिळवला. यातून मिळालेल्या पैश्यांनी तिने आपल्या आईची ज्वेलरी सोडवली आणि वेगळ्या फ्लॅटमध्ये सुद्धा राहण्यास सुरुवात केली. 


भावाच्याच नावाने ओळखली जाते सनी...
सनी लियोनीचे खरे नाव करनजीत कौर आहे. पॉर्न इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी ती याच नावाने ओळखली जात होती. परंतु, पॉर्न इंडस्ट्रीमध्ये तिने कुणालाही आपले खरे नाव सांगितले नव्हते. भावाचे नाव सनी होते, आणि घरात त्याला लाडाने सनी असे म्हटले जात होते. बाहेरच्या जगात तिने आपले नाव सुद्धा सनीच ठेवले. तेव्हापासून आतापर्यंत तिला करनजीत नव्हे, तर सनी लियोनी या नावाने ओळखले जाते. 


प्रोफेशनल शेफ आहे सनीचा भाऊ
सनी लियोनीचा लहान भाऊ संदीप कॅलिफोर्नियात फेमस 'किंग्स रो गेस्ट्रो' पबमध्ये एक्झेक्युटिव्ह शेफ म्हणून कार्यरत आहे. देशभर त्याच्या हातच्या डिशेजला पसंती दिली जाते. संदीप वोहराने अतिशय कमी वयात स्टार्प म्हणून पब सुरू केले होते. त्याच पबमध्ये शेफ होऊन त्याने सर्वांना आपल्या हातच्या डिशेजची सवय लावली.

 


Loading...

Recommended


Loading...