Loading...

मराठमोळ्या नम्रता शिरोडकरचा पती आहे 127 कोटींचा मालक, नवीन चित्रपटात करणार सीएमची भूमिका

आज मराठमोळी अभिनेत्री नम्रता शिरोडकर तिचा 46वा वाढदिवस साजरा करत आहे.

Divya Marathi Jan 31, 2018, 15:37 IST

साऊथचा सुपरस्टार महेश बाबूचा आगामी सिनेमा 'भारत आने नेनु'चे ऑडियो टीजर रिपब्लिक डे म्हणजेच 26 जानेवारी रोजी रिलीज झाले आहे. या चित्रपटात महेशबाबू सीएमच्या भूमिकेत दिसणार आहे. डायरेक्टर कोरतल्ला शिवा यांचा हा चित्रपट 27 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात महेशबाबू बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीसोबत प्रथमच स्क्रिन शेअर करणार आहे. 

 

 महेशबाबूने मराठमोळी अभिनेत्री नम्रता इशरोडकरसोबत विवाह केला आहे. नम्रता गेल्या अनेक वर्षांपासून लाईमलाईटपासून दूर आहे. 1993 साली मिस इंडिया बनल्यानंतर नम्रता चर्चेत आली होती. 22 जानेवारी 1972 साली जन्मलेली नम्रता आता तिच्या फॅमिली लाईफमध्ये व्यस्त आहे. साऊथ सुपरस्टार महेशबाबूसोबत तिने लग्न केले आहे. आता तिला दोन मुले आहेत सितारा आणि गौतम. लग्नानंतर पतीसोबत नम्रता हैदराबाद येथे आलिशान आयुष्य जगत आहे. इतकी आहे नम्रताच्या पतीची संपत्ती...

 

नम्रताचा पती आणि साऊथ सुपरस्टार महेश बाबू 127 कोटींचा मालक आहे. वयाच्या 4थ्या वर्षी चाईल्ड आर्टीस्ट म्हणून महेशबाबून काम करण्यास सुरुवात केले होते. नम्रता हैदराबाद येथे 11 कोटीच्या लक्झरी मॅन्शनमध्ये राहते. त्यातड्रॉइंग रूम, डाइनिंग रूम, स्टडी रूम, पूजा घर, मुलांसाठी प्ले रूम आहे. सुरक्षेचा विचार करता बंगल्याच्या वॉल कंपाउंडची उंची फार जास्त आहे. याशिवाय ज्युबिली हिल्सवरही एक मोठा बंगला आहे.

 

नम्रताकडे लक्झरी गाड्यांचा ताफा आहे त्यात Lamborghini Gallardo (3 कोटी), Range Rover Vogue (1.6 कोटी रुपये),  Toyota Land Cruiser (1.6 कोटी), Mercedes Benz E class(49 लाख )Audi A 8 (1.30 कोटी) असे गाड्यांचे कलेक्शन आहे. महेश बाबू एका चित्रपटासाठी जवळपास 18 ते 20 कोटी रुपये घेतो.

 

नम्रता शिरोडकरची बहीण शिल्पा शिरोडकरही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. शिल्पा सध्या टीव्ही मालिकांमध्ये काम करण्यात व्यस्त आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, नम्रता-महेशबाबू यांच्या घराचे आणि फॅमिलीचे काही खास PHOTOs....


Loading...

Recommended


Loading...