Loading...

झोपेतून उठल्यानंतर कशा दिसतात हॉलिवूडच्या सौंदर्यवती, फोटोग्राफरने क्लिक केले PHOTOS

सेलिब्रिटी फोटोग्राफर वेरोनिक वायल यांनी हॉलिवूडच्या आघाडीच्या मॉडेल्स आणि अभिनेत्रींचे एक अनोखे फोटोशूट केले आहे.Phot

Divya Marathi Jun 12, 2018, 00:12 IST

सेलिब्रिटी फोटोग्राफर वेरोनिक वायल यांनी हॉलिवूडच्या आघाडीच्या मॉडेल्स आणि अभिनेत्रींचे एक अनोखे फोटोशूट केले आहे. या सौंदर्यवतींचा झोपेतून उठल्यानंतरचा लूक वेरोनिक यांनी आपल्या कॅमे-यात क्लिक केला आहे. या शूटमध्ये एक्स्ट्रा लाइट किंवा कॅमरा पर्सनचा समावेश नाहीये. 


नॅचरल सिच्युएशनमध्ये केले फोटोशूट...
या फोटोशूटमध्ये वेरोनिक यांनी मॉडेल्स आणि अभिनेत्रींना जांभई घेण्याची आणि स्मोक करण्याची परवानगी दिली होती. फोटोग्राफर वेरोनिक यांना या सेलिब्रिटींचा मेकअप आणि लाईटविनाचा नॅचरल लूक लोकांना दाखवायचा होता.  यासाठी त्यांनी या सेलिब्रिटींच्या सकाळच्या लूकची निवड केली. कारण झोपेतून उठल्याने या अभिनेत्रींचा खरा लूक त्यांना कॅमे-यात कैद करता आला. या सौंदर्यवतींचा खरे रुप त्यांना दाखवायचे होते. सोशल साइट्सवर लोकांनी वेरोनिक यांच्या या एक्सपिरिमेंटचे कौतूक केले आहे. 


अमेरिकन फिल्ममेकर आणि अभिनेत्री अँजेलिना जोली हिला आपण अनेक फंक्शन्समध्ये पाहिले. तिचा ग्लॅमरस लूकच नेहमी आपल्या बघण्यात आला आहे. पण फोटोग्राफर वेरोनिक यांनी तिचा जो लूक दाखवला आहे, तो नक्कीच यापूर्वी कधीही तिच्या चाहत्यांनी बघितला नसेल. 


पुढील स्लाईड्सवर बघा हॉलिवूडच्या सेलिब्रिटींच्या यापूर्वी कधीही न पाहिलेला अंदाज... 
 


Loading...

Recommended


Loading...