Loading...

100 कोटींच्या कारमधून फिरतात 'मिस्टर बीन', ब्रिटनच्या सर्वात श्रीमंतांपैकी आहेत एक

सध्या सोशल मीडियावर मिस्टर बीन अर्थातच रोवन यांच्या निधनाची अफवा पसरली आहे.

Divya Marathi Jul 21, 2018, 00:19 IST


मुंबईः 90 च्या दशकात घराघरांत आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे मिस्टर बीन नक्कीच तुम्हाला आठवत असतील. जवळजवळ पाच वर्षे या चाललेल्या मिस्टर बीन या शोमधून 63 वर्षीय अभिनेते रोवन एटकिंसन मिस्टर बीन या नावानेच प्रसिद्ध झाले. आजही लोक त्यांना त्यांच्या ख-या नावाने नव्हे तर याच नावाने ओळखतात. सध्या सोशल मीडियावर रोवन यांच्या निधनाची अफवा पसरली आहे. रोवन ठीक असून लॅव्हिश आयुष्य व्यतीत करत आहेत.


जगातील सर्वाधिक महागड्या कारचे मालक आहेत रोवन...

- मिस्टर बीन अर्थातच रोवन यांच्या प्रॉपर्टीविषयी बोलायचे झाल्यास, ते 8 हजार कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. ब्रिटनच्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी ते एक आहेत.
- रोवन यांचे लंडन येथे आलिशान घर असून त्याची किंमत कोटींच्या घरात आहे. इतकेच नाही तर त्यांच्याजवळ जगातील सर्वात महागड्या कारपैकी एक असलेली मॅकलॉरेन एफ-1(mclaren F1 car) ही आलिशान कार आहे.
-  1990 च्या सुरुवातीच्या काळात मॅकलॉरेन एफ-1 ची किंमत 5 लाख 40 हजार यूरो होती. आजच्या काळात या कारची किंमत सुमारे 80 ते 100 कोटींच्या घरात आहे.  


Loading...

Recommended


Loading...