Loading...

मर्लिनच्या सौंदर्याला होता अभिशाप! ड्रग्ज, अनाथाश्रम, तुटलेली लग्ने आणि अखेर केली आत्महत्या

सोशल मीडियावर असे फार कमी लोक असतील ज्यांना मर्लिन म्युरोविषयी माहिती नाही.

Divya Marathi Jun 01, 2018, 14:35 IST

सोशल मीडियावर असे फार कमी लोक असतील ज्यांना मर्लिन म्युरोविषयी माहिती नाही. मृत्यूच्या 50 वर्षानंतरही मर्लिनच्या सौंदर्याची सर्वांनाच भूरळ पडते. काही जण मर्लिनला अजूनही सेक्स सिंबल मानतात आणि तिच्या अदांमुळे घायाळ आहेत. आज मर्लिनची बर्थ अॅनिवर्सरी आहे.  हॉलिवूडमधील एक बिनधास्त, सुंदर आणि मादक अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेल्या मर्लिन म्यूरोविषयी खास माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

 

फार कमी लोकांना माहीत आहे की, मर्लिन केवळ एक लोकप्रिय अभिनेत्री नव्हे तर गायिकाही होती. मर्लिन मुनरोच्या सौंदर्याचे आणि तिच्या अफेअरचे किस्स्यांची आजही चर्चा होते. मर्लिन मुनरोच्या चेहऱ्याची निरागसता, मादक डोळे आणि तिच्या ओठांच्या सुंदरतेसाठीही लोकप्रिय होती. 

मुनरोचा जन्म 1 जून 1926 रोजी अमेरिका येथील लॉस एंजिलीस येथे झआला. तिचे खरे नाव नॉरमा जीन मोर्टेनसेन होते. मर्लिनच्या जन्मावेळी  तिचे आईवडील विवाहीत नव्हते. मर्लिनचे लहानपण फार कष्टात गेले आणि तिने अनेक वर्षे अनाथश्रमात घालवले. वयाच्या 16व्या वर्षीच तिने लग्न केले होते. 

 

ग्लॅमरस गर्ल मर्लिन मुनरोला कॅलेंडर गर्लच्या रुपात खूप लोकप्रियता मिळाली जेव्हा तिचे नग्न फोटो कॅलेंडरवर झळकले होते.  एकीकडे तिच्या या नग्न फोटोंचे खऊप कौतुक झाले तर दुसरीकडे इंडस्ट्रीच्या लोकांचे खराब कमेंट्सही मिळाले. 

 

पुढच्या स्लाईडवर वाचा, खऱ्या प्रेमासाठी तरसत होती मर्लिन...


Loading...

Recommended


Loading...