Loading...

रेप करून हातात ठेवले 10 रुपये: म्हणाला, बेटा कुणाला सांगू नकोस; 52 वर्षांच्या घरमालकाला अटक

आरोपीने या मुलीला 10 रुपये आणि चॉकलेटचे अमीष देऊन गॅरेजमध्ये बोलावले. यानंतर गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला.

Divya Marathi Aug 11, 2018, 14:56 IST

सुरत - शहरातील चलथाण परिसरात शुक्रवारी एका 52 वर्षीय घरमालकाने आपल्या भाडेकरुंच्या अवघ्या 9 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. चिमुकली रडताना घरी पोहोचली तेव्हा आईने विचारले. त्याचवेळी तिने आपल्यावर घडलेला अत्याचार सांगितला. आरोपीने या मुलीला 10 रुपये आणि चॉकलेटचे अमीष देऊन गॅरेजमध्ये बोलावले. यानंतर गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. वेदनेने किंचाळून ती शुद्धीवर तेव्हा नराधमाने तिच्या हातात 10 रुपये आणि चॉकलेट ठेवला. तसेच कुणालाही सांगू नकोस असे म्हटले. या घटनेवर संतप्त नागरिकांनी नराधमाला भर रस्त्यावर आणून चोप दिला. त्याचवेळी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्याला अटक केली. या मारहाणीत रक्तरंजित झालेल्या आरोपीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 


4 तास बेशुद्ध होती चिमुकली
सुरतच्या चलथाण तुलसी पार्क परिसरात राहणारा 52 वर्षीय राजू बॉडीवाला याच्या गॅरेजच्या छतावर पीडितेचे कुटुंबीय भाड्याने राहतात. पाचवीला असलेली मुलगी शुक्रवारी सकाळी सव्वा 11 च्या सुमारास शाळेसाठी निघाली होती. खाली येताना तिला राजूने 10 रुपयांचा नोट आणि चॉकलेट दाखवले. ते घेण्यासाठी हसत-हसत चिमुकली त्याच्या गॅरेजमध्ये पोहोचली. याचवेळी राजूने मुलीला गुंगीचे औषध असलेले पेय दिले. बेशुद्ध पडताच नराधमाने तिची अब्रू लुटली. ती 4 तास गॅरेजमध्येच बेशुद्ध पडली होती. शुद्धीवर आली तेव्हा नराधमाने तिच्या हातात 10 रुपये दिले आणि बेटा कुणाला सांगू नकोस असे म्हटले. 


आरोपीची सर्वात लहाणी मुलगीही 21 वर्षांची!
आरोपी राजूला 2 मुले आणि 1 मुलगी आहे. त्याची सर्वात लहाणी असलेली मुलगी सुद्धा 21 वर्षांची आहे. तो मूळचा हरियाणा येथील निवासी आहे. 35 वर्षांपूर्वी तो गुजरातला येऊन स्थायिक झाला. तो ट्रकची बॉडी बनवण्याचे काम आपल्या गॅरेजमध्ये करतो. घटना घडली त्यावेळी राजूच्या गॅरेजमध्ये कुणीही नव्हते. पीडित मुलीच्या मामांनी सांगितले, की ती रडतानाच घरी आली होती. तिने आपल्या आईला संपूर्ण घटनाक्रम सांगितला. यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. त्याच दिवशी सायंकाळी 4 च्या सुमारास रुग्णालयाने तिच्यावर बलात्कार झाल्याचा अहवाल जारी केला. तरीही पोलिसांनी फक्त छेडछाड आणि गैरवर्तनाचा गुन्हा दाखल केला. कुटुंबियांनी 6 तास विनंत्या केल्यानंतर अखेर 10 वाजता त्यांनी पोक्सो अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला.


Loading...

Recommended


Loading...