Loading...

Birth Anni: पहिल्याच फिल्ममध्ये डिंपल कपाडियाच्या बहिणीने राजेश खन्नांसोबत केला होता रोमान्स, फ्लॉप होते फिल्मी करिअर

डिंपल कपाडियांची बहीण सिंपल कपाडिया बॉलिवूड अभिनेत्री होती.

Divya Marathi Aug 15, 2018, 00:31 IST

मुंबई: डिंपल कपाडियांची बहीण सिंपल कपाडिया बॉलिवूड अभिनेत्री होती. अनेक सिनेमांमध्ये अभिनयासोबतच फॅशन डिझायनर म्हणूनही तिने काम केले होते. बॉलिवूडचे प्रसिद्ध खलनायक रंजीतसोबत सिंपल कपाडियाचे नाव जुळले होते. सिंपल आता या जगात नाही. या जगाचा निरोप घेऊन तिला जवळजवळ 8 ते 9 वर्षे झाली आहेत. आज सिंपल कपाडिया ह्यात असती तर तिने वयाची 61 वर्षे पूर्ण केली असती. 10 नोव्हेंबर 2009 रोजी कॅन्सरमुळे सिंपलची प्राणज्योत मालवली होती.


फ्लॉप ठरली होती भावोजी राजेश खन्नांसोबतची केमिस्ट्री...

वयाच्या 18व्या वर्षी सिंपलने अभिनेत्री म्हणून अभिनय करिअरला सुरुवात केली. 1977मध्ये 'अनुरोध'मधून तिने पहिल्यांदा अभिनय केला होता. या सिनेमात तिचे को-स्टार राजेश खन्ना होते. त्यावेळी राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांचे लग्न झाले होते. एका मुलाखतीत सिंपलने सांगितले होते, की राजेश खन्नांसोबत रोमान्स करताना ती कम्फर्टेबल नसायची. तसं पाहता, प्रेक्षकांनासुद्धा राजेश खन्ना आणि सिंपल यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री पसंत पडली नव्हती आणि हा सिनेमा फ्लॉप ठरला होता. 10 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये सिंपलने लूटमार (1980), शाका (1981), परख (1981), दूल्हा बिकता नही (1982), हम रहे ना हम (1984), प्यार के दो पल (1986)सह अनेक सिनेमे दिले. पण सिंपलचे फिल्मी करिअर फारसे यशस्वी ठरले नाही. 

 

राजेश खन्ना-जिंतेद्रसोबत केला रोमान्स
'अनुरोध'मध्ये सिंपल राजेश खन्ना यांच्यासोबत रोमान्स करताना दिसली. त्यानंतर 'शाका' सिनेमात चॉकलेट अभिनेता जितेंद्र होते. छोट्या फिल्मी करिअरमध्ये सुपरस्टार्स शिवाय सिंपल शेखर सुमनसोबतसुध्दा काम करताना दिसली होती.

 

'रुदाली'साठी केला होता ड्रेस डिझाइन
1987 मध्ये फिल्मी करिअर सोडून सिंपलने फॅशन डिझाइनर होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी तब्बू, अमृता सिंह, श्रीदेवी आणि प्रियांका चोप्रासारख्या अभिनेत्री तिच्या क्लाइंट्स होत्या. 1994मध्ये 'रुदाली'साठी सिंपलला उत्कृष्ट कॉश्च्युम डिझाइनरचा नॅशनल अवॉर्ड मिळाला होता. शिवाय तिने अनेक सिनेमांसाठी ड्रेस डिझाइन केले. त्यामध्ये शहजादे (1989), अजूबा (1991), डर (1993), रुदाली (1993), बरसात (1995), घातक (1996), चाची 420 (1998), जब प्यार किसी से होता है (1998), कसम (2001), सोचा ना था (2005)सारखे सिनेमे सामील आहेत.

 

कर्करोगाने झाला मृत्यू
2006मध्ये सिंपलला कर्करोग असल्याचे निदान झाले होते. कर्करोगावर उपचार चालू असतानासुध्दा तिने आपले काम चालू ठेवले. परंतु 10 नोव्हेंबर 2009 रोजी मुंबईच्या एका हॉस्पिटलमध्ये तिचा मृत्यू झाला. त्यावेली सिंपल 51 वर्षांची होती.

 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सिंपल कपाडियाची काही निवडक छायाचित्रे...


Loading...

Recommended


Loading...