Loading...

म्हैसमाळ-खुलताबाद, वेरूळसाठी ४३८ कोटींचा विकास आराखडा मंजूर

राज्य सरकारने ४३८.४४ कोटी रुपयांच्या ‘म्हैसमाळ, वेरुळ- खुलताबाद आणि शूलिभंजन’ विकास आराखड्यास मान्यता दिली आहे.

Divya Marathi Sep 08, 2018, 09:27 IST

मुंबई- राज्य सरकारने ४३८.४४ कोटी रुपयांच्या ‘म्हैसमाळ, वेरुळ- खुलताबाद आणि शूलिभंजन’ विकास आराखड्यास मान्यता दिली आहे. या आराखड्यातील कामे वेगाने पूर्ण होण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाने ५० कोटी रुपयांचा तर वन विभागाने २ कोटी रुपयांचा निधी तत्काळ उपलब्ध करून द्यावा, असे आदेश अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. 


औरंगाबाद जिल्हा देश-विदेशातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असून येथे येणाऱ्या पर्यटकांना दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा निधी दिला जाणार आहे. सह्याद्री आितथीगृहात झालेल्या याबाबतच्या बैठकीत रस्ते विकास, पाणीपुरवठा, गावतळे ,सिमेंट नाला बांध, नवीन गिरिजा माता तळे निर्माण करणे, विद्युत पुरवठा, पथदिवे पाऊल वाटा अशा विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला.

 


Loading...

Recommended


Loading...