Loading...

मुंबईचे मेजर कौस्तुभ राणे यांना वीरमरण, घुसखोरीच्या प्रयत्नातील 2 दहशतवाद्यांना कंठस्नान

घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या अतिरेक्यांशी उडालेल्या चकमकीत मेजर कौस्तुभ प्रकाश राणे या महाराष्ट्रातील अधिकाऱ्यास वीरमरण

Divya Marathi Aug 08, 2018, 06:32 IST

श्रीनगर- जम्मू-काश्मिरातील बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या अतिरेक्यांशी उडालेल्या चकमकीत मेजर कौस्तुभ प्रकाश राणे या महाराष्ट्रातील अधिकाऱ्यास वीरमरण आले. रायफलमॅन मनदीपसिंग रावत, हवालदार हमीरसिंग आणि विक्रमजीतसिंग हे तीन जवानही शहीद झाले.

 

या कारवाईत चार अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. शहीद मेजर राणे हे ठाणे जिल्ह्यातील मीरा रोडचे रहिवासी आहेत. त्यांच्या पश्चात आई-वडील, बहीण, पत्नी व अडीच वर्षांचा मुलगा आहे. मेजर राणे मूळचे कोकणातल्या वैभववाडीचे आहेत. गेल्या ३० वर्षांपासून मीरा रोड परिसरात वास्तव्यास होते. 

 


Loading...

Recommended


Loading...