Loading...

Shocking: शाळेतून परतलेल्या 3 वर्षीय मुलीच्या अंतर्वस्त्रांमध्ये सापडले रक्ताचे डाग, डॉक्टरांनी केला धक्कादायक खुलासा

चिमुकली शाळेतून परतली तेव्हा कपडे बदलताना आईला ही गोष्ट सर्वप्रथम लक्षात आली.

Divya Marathi Sep 12, 2018, 00:04 IST

नवी दिल्ली - देशाच्या राजधानीत एका अवघ्या 3.5 वर्षांच्या मुलीच्या लैंगिक हिंसाचाराची घटना समोर आली आहे. चिमुकली शाळेतून परतली तेव्हा कपडे बदलताना आईला ही गोष्ट सर्वप्रथम लक्षात आली. आई-वडिलांच्या तक्रारीवर पोलिसांनी कारवाई केली नाही. उलट शाळेला क्लीनचिट देऊन पालकांनाच दमदाटी केली. पालकांनी आपल्यासोबत डॉक्टरांचा वैद्यकीय अहवाल देखील नेला तरीही पोलिस त्यास मान्य करण्यास तयार नाहीत. आता पीडित मुलीच्या पालकांनी या प्रकरणाची चौकशी गुन्हे शाखेकडून करण्यात यावी अशी मागणी केली आहे. 


अंतर्वस्त्रांमध्ये सापडले रक्ताचे डाग
पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांची मुलगी जवळच्या एका शाळेत नर्सरीत शिकत आहे. 4 सप्टेंबर रोजी ती घरी परतली तेव्हा आई तिच्या शाळेचा युनिफॉर्म काढत होती. त्याचवेळी तिला मुलीच्या अंतर्वस्त्रांवर रक्ताचे डाग सापडले. रक्त पाहून प्रचंड घाबरलेल्या आई-वडिलांनी थेट रुग्णालय गाठले. डॉक्टरांनी वैद्यकीय चाचण्या घेतल्यानंतर चिमुकलीवर लैंगिक हिंसाचार झाला असे स्पष्ट केले. आई-वडिलांनी सांगितल्याप्रमाणे, मुलीने यापूर्वीही अनेकवेळा पोटदुखीची तक्रार केली. परंतु, त्यावेळी पालकांनी फारसे लक्ष दिले नव्हते. डॉक्टरांचे रिपोर्ट पाहताक्षणी त्यांनी पोलिस स्टेशन गाठले. 


पोलिसांनी केली दमदाटी...
पीडित मुलीचे आई-वडील वैद्यकीय अहवाल घेऊन पोलिसांत तक्रार करण्यासाठी गेले. परंतु, तक्रार दाखल करण्यापूर्वीच पोलिसांनी शाळेला क्लीनचिट दिली. एवढेच नव्हे, तर त्या मुलीला घरीच जखमा झाल्या असव्यात असे तर्क-वितर्क देऊन पालकांना पिटाळून लावले. पुन्हा-पुन्हा चौकशी केली तेव्हा पोलिसांनी कथितरित्या शाळेतील सीसीटीव्ही फुटेज घेतल्याचा बनाव केला. तसेच चौकशी न करता पुन्हा शाळेला क्लीनचिट दिली. यावर वडिलांनी आक्षेप घेतला तेव्हा पोलिसांनी उलट त्यांनाच धमकावले. आता या पालकांनी प्रकरणाची गुन्हे शाखेकडून चौकशीची मागणी केली आहे. 


Loading...

Recommended


Loading...