Loading...

छत्तीसगडमध्ये उडलेल्या चकमकीत पोलिसांनी केला १५ नक्षलींचा खात्मा

कोंटा गावापासून २० किमी अंतरावर पोलिसांसोबत उडलेल्या चकमकीत सोमवारी १५ नक्षलवाद्यांना यमसदनी पाठवण्यात आले.

Divya Marathi Aug 07, 2018, 05:46 IST

जगदलपूर- छत्तीसगड बस्तरच्या कोंटा गावापासून २० किमी अंतरावर पोलिसांसोबत उडलेल्या चकमकीत सोमवारी १५ नक्षलवाद्यांना यमसदनी पाठवण्यात आले. नक्षलवाद्यांनी नुलकातोंग येथून पुढे असलेल्या डोंगरांत आपला कॅम्प तयार केला होता. येथून जवानांनी मोठ्या प्रमाणात आयईडी बनवण्याचे साहित्य जप्त केले. येथे सुमारे ५० नक्षली होते. त्यापैकी १५ मृतदेह ताब्यात घेण्यात आले. १२ जणांची ओळख पटली आहे. ६ नक्षली जखमी झाल्याची माहिती आहे. 

 

येथे नक्षलवादी स्थानिक ग्रामस्थांना इम्प्रोव्हाइज्ड एक्स्प्लोसिव्ह डिव्हाइस (अायईडी) बनवणे, ते फिट करणे व त्याच्या माध्यमातून स्फोट घडवून आणण्याचे प्रशिक्षण देणार होते. तसेच नक्षलवाद्यांंची येथे एक मोठी बैठकही होती. पोलिस महानिरीक्षक विवेकानंद सिन्हा यांनी सांगितले की, गुप्त माहितीच्या आधारावर २०० जवानांनी पहाटेच नक्षल्यांच्या कॅम्पकडे कूच केले. जवानांना पाहताच नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. 


Loading...

Recommended


Loading...